पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[३]

खून त्याकडे अधिक लक्ष देण्याचें करावें अशी त्यांस कळकळीची व नम्र विनंति आहे.
 अलीकडे, पूर्वीच्या काळीं सर्वमान्य झालेले अर्थशास्त्राचे कांहीं सिद्धांत, कांही पाश्चात्य अर्थशास्त्रज्ञांच्या मतें चुकीचे ठरविण्यांत येत आहेत. तरी त्या दृष्टीनें या निबंधांत अनुसरलेल्या सिद्धांतावर सांगोपांग चर्चा व्हावी अशी विनंति आहे.
 कार्यबाहुल्यामुळे सवड नसतांहि, त्यांतल्यात्यांत सवड काढून या पुस्त काचे हस्तलिखित वाचून त्यांत कांहीं सुधारणा सुचवून; प्रस्तुत लेखकाचे विनंतीस मान देऊन या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली, याबद्दल लेखक पुण्याचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रो. वा. गो. काळे यांचा अत्यंत ऋणी आहे. हैं ऋण येवढ्यावरच संपत नसून, प्रो. काळे यांनी महाराष्ट्र जनतेला अर्थशास्त्राची सांगोपांग माहिती करून देण्याच्या उदात्त हेतूनें मराठीतून जें " अर्थ " नांवाचें साप्ताहिक घस सोसून गेलीं तीन चार वर्षे चालविलें आहे,त्याच्या सतत वाचनाचा प्रस्तुत लेखकास अर्थशास्त्राच्या अभ्यासाकडे लक्ष वेघण्याचें काम प्रामुख्याने उपयोग झालेला असल्यामुळे, प्रस्तुत लेखक त्यांचा शतशः ऋणी आहे.
 अर्थशास्त्राच्या विषयाला वाहिलेलें असें हें साप्ताहिक मराठी भाषेत ' एकमेव ' असूनही महाराष्ट्र जनतेनें त्याचा योग्य सत्कार अजून केलेला नाहीं यावरून महाराष्ट्र जनतेची या विषयाबद्दलची अनास्था किती आहे, हें दिसून येतें, निदान सराफ व व्यापारी वर्ग यांनीं तरी ही अनास्था सोडून सदर सात्पाहिकाचे ग्राहक होऊन त्यांतील उपयुक्त माहितीचा आपले व्यवसायांत उपयोग करून घ्यावा अशी त्यांस कळकळीची विनीत आहे.
 प्रो. गो. प. पटवर्धन, माजी हेडमास्तर हरिभाई देवकरण हायस्कूल, श्रीयुत बेके, श्रीयुत डॉ. वा. का. किर्लोस्कर, व्ही. आर. गोडबोले, श्रीयुक्त के. व्ही. गाडगीळ वकील; श्रीयुत गोविंदराव शिदोरे माजी सुपरिन्टेन्डेन्ट हरिभाई देवकरण हायस्कूल, श्रीयुत दत्तोपंत सराफ, अध्यापक जैन बोर्डिंग,