पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

यंग कमिशननें आहे तेंहि नाणें काढून टाकून नवीन सुवर्ण चलन कोही वर्षेपर्यंत तरी मुळींच पाडूं नये अशी शिफारस केली.

" सुवर्ण चलनाच्या मार्गातील अडचणी "

 सदर कमिशननें हिंदुस्थानांत सोन्याचे नाणें सुरूं न करण्याचा जो अभिप्राय दिला तो कोणता उद्देश मनांत ठेऊन दिला हें खालील एकाच उदाहरणावरून दिसून येईल.
 येथें सुवर्णाचें नाणें सुरू केलें तर चांदीचा भाव घसरेल, व चीनमध्यें चांदीचे नाणे सुरू असल्यामुळे तेथील चलन पद्धतींत घोटाळा माजेल, आणि असें झालें तर त्याचे परिणाम हिंदुस्थानास भोगावे लागतील. हा अभिप्राय कशाच्या आधारावर उभारला आहे हें रूर चार्लस एडिस यांच्या सदर कमिशन पुढे झालेल्या साक्षींतील खालील एकाच वाक्यावरून कळून येईल. “ It (China) is the greatest country, perhaps the only great undeveloped country left for the expansion of British Industry" ( ब्रिटिश उद्योगधंद्याची वाढ होण्यास चीन खेरीज जगांतील दुसरा कोणताहि मोठा देश आतां शिल्लक उरलेला नाहीं. )
 हिंदुस्थानचा चीनमध्ये फारच थोडा हितसंबंध असतांना कमिशननें अपल्या रिपोर्टात पानेच्या पार्ने सुवर्णचलन येथे चालू केल्यास चीन देशावर त्याचा काय परिणाम होईल, याचा विचार करण्यांत खर्ची घाली आहेत, व सुवर्णचलन येथें चालू करण्याच्या मार्गातील अनेक अडचणीपैकी खालील एक अडचण दिली होती:-
 (If India adopted a gold currency, the price of silver would fall. It must injure China. This would be a most serious matter, for China is the greatest and perhaps the only great undeveloped market left for the expansion of International trade)  [ हिंदुस्थानने सुवर्ण चलन सुरू केलें म्हणजे चांदीचा भाव घसरेल, चीनमध्यें चांदीचे नाणे सुरू असल्यामुळे तेथील चलन पद्धतीत घोटाळा