पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हुंडणावळीचे कायदेशीर दरांत बदल

३७

मापक पद्धतिपेक्षां ( Gold exchange standard ) कांहीं विशेष. असल्यास तो हाच कीं, या पद्धतींत खऱ्याखुऱ्या सुवर्णचलन पद्धतीप्रमाणें पदार्थांचे मोल सोन्याच्या भावानें आकारण्याची तजवीज होती; तशीच लोकांस चांदीचें नाणें व नोटा ह्यांचा सोन्याशीं विनिमय करण्याचीही सोय होती.
 परंतु या व्यवस्थेत एक गोम होती ती ही की, लोकांस दर तोळ्यास २१रु, ३ आ. १० पै या भावानें सोने विकण्याची जी जबाबदारी सरकारवर टाकली होती ती ४०० औंस वजनाचे सोनें एकदम घेणारा- संबंधानेंच फक्त होती. यामुळे या पद्धतीत फारच क्वचित लोकांचें हातांत सोनें लागत होते हैं उघड आहे.
 कमिशननें १९२५ सालीं प्रचारांत असलेल्या सुवर्णविनिमय मापक चलन पद्धतीचा ( Gold exchange standard ) निषेध करून ज्या व्यवस्थेनें हिंदी लोकांस रुपये किंवा नोटा ह्यांचा सोन्याशी असलेला संबंध प्रत्यक्ष दिसत नाहीं, किंवा जीमध्ये रुपये किंवा नोटा देऊन लोकांस सोनें मोबदला मिळण्याची तरतूद नाहीं असली पद्धति हिंदुस्थानास गैर- लागू आहे असें स्पष्ट मत त्यानें नमूद केलें आहे.
 १८९८ साली फौलर कमिटीनें हिंदुस्थानांत सुवर्णचलन चालू करावें व सोन्याचे नाणें येथें पाडण्याकरितां टांकसाळ सुरू करावी, अशी शिफारस केली असतां हिंदुस्थान सरकारने ती धाब्यावर बसवून ही सुवर्णविनिमय मापक पद्धति (Gold exchange standard ) प्रचारांत आणली. १९१३ सालीं चेंबरलेन कमिशननें तिच्यावर आपल्या पसंतीचें शिक्कामोर्तब केले, व १९१९ साली बॅबिंगटन स्मिथ कमिटीनेंहि या पद्धतीस मान्यता दिली असतां हिल्टन यंग कमिशननें ती वरील प्रमाणे निषिद्ध ठरविली, ही एक समाधानाची गोष्ट होय. यावरून हिंदी अर्थशास्त्रज्ञांनी या पद्धतीवर वेळोवेळी केलेली टीका सार्थ होती हैं आपोआपच सिद्ध झालें.
 आज नाहीं उद्या, सोन्याची टांकसाळ देशांत सुरू होऊन सोन्याचें नाणें चालू होणार अशी लोकांस आशा वाटत होती, तर हिल्टन