पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
हिंदी चलन पद्धतीचा इतिहास

हिंदी लोकमतानें केली होती, तिला अनुसरून हिल्टनयंग कमिशनकडे सोप- विलेल्या प्रश्नांची योजना करण्यांत आली. कमिशनला मुख्यत्वेकरून दोन महत्वाच्या बाबीसंबंधानें आपलें मत बनवावयाचें होतें. पहिली बाब, हिंदु- स्थानांत सुवर्णचलन पद्धति पूर्णत्वाने चालू करणे इष्ट व शक्य आहे किंवा नाहीं, आणि दुसरी, मूल्य मापनाचे परिमाण म्हणजे हुंडणावळीचा दर कोणता असावा ही होय.
 पहिल्या प्रश्नाचे कमिशनने असे उत्तर दिलें कीं, सध्यांची अर्धबोबडी . सुवर्णपद्धति सोडून देणें तर आवश्यक आहे; तथापि सुवर्ण मूल्यमापन व सुवर्णचलन यांची सांगड असलेली व चोहोंकडे प्रचलित असलेली बाळ- बोध व्यवस्था सुरू करणें अनिष्ट आणि अहितकारक आहे. दुसन्या बाबीचा निकाल कमिशनने १८ पेन्स दराच्या बाजूस आपले ठाम मत देऊन केला. आतां परंपरागत शुद्ध अशी सुवर्णचलन ( Gold - standard) पद्धतीही नाहीं, त्याचप्रमाणे त्यावेळी चालू असलेली धेडगुज- ही पद्धतहि नाहीं, तर मग त्यांच्या ऐवजी दुसरी कोणती योजना प्रचा- रांत आणणे शक्य आहे ? ह्याला उत्तर म्हणून कमिशनने तिसराच एक मार्ग सुचविला आणि तो म्हणजे " सुवर्णखंड मूल्यमापन पद्धति ' हा होय.

" सुवर्णखंड मूल्यमापन पद्धति ” ( Gold bullion Standard )

 टांकसाळीतून सोन्याचे नाणे पाडून देणें म्हणजे सुवर्णाचा अपव्यय करण्यासारखें आहे, आणि तसें करावयाचे ठरविलें, तरी ते मोठ्या खचीचे व दुःसाध्य ध्येय असल्याने नाण्यांच्या ऐवजी सोन्याच्या लगडी व चिपा देण्याची व्यवस्था झाली असतां सुवर्णचलन पद्धतीचा मुख्य हेतु सिद्धीस ..जाऊन लोकांचा समाधान होईल असें कमिशनने मत दिले. या पद्धतीत शुद्ध सुवर्णचलन पद्धतीतले दोष नसून गुण मात्र आहेत, असें कमिशनने या पद्धतीचें वर्णन केले आहे.
 या सुवर्णखंड मूल्यमापन पद्धतीत (Gold bullion standard) १८९९ खाल्ापासून १९२० सालापर्यंत चालू असलेल्या सुवर्ण विनिमय