पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

नाण्यांची वाढती मागणी इतक्या भारी किंमतीनें चांदी विकत घेऊन पुर- विणें सरकारला तोट्याचें होऊन पौंडाचा व रुपयाचा परस्पर संबंध चांदीच्या किंमतींत होणाऱ्या चढउतारावर त्यांनी अवलंबून ठेविला व यामुळे रुपयाची किंमत वाढून ती डिसेंबर १९१९ मध्ये २ शिलिंग ४ पेन्स इतकी वर गेली.

"हुंडणावळीचे कायदेशीर दरांत बदल"

 तेव्हां १९१९ च्या अखेर बॅबिंगटन स्मिथ कमिटीने केलेल्या शिफारसी हिंदुस्थान सरकारने मान्य करून रुपयाची किंमत २४ पेन्स ठरविली. परंतु दैवयोगाने याच सुमारास हिंदी आयात-निर्यातीचे प्रमाण पुनः बदललें. हिंदी व्यापाऱ्यांनी पुष्कळ परदेशी माल मागविला, परदेशी कापडास मागणी वाढली व निर्गत मात्र कमी झाली. जपाननें कमी कापूस खरेदी केला; आणि ताग, चहा व कातर्डी यांसही परदेशांत पहिल्यासारखी मागणी येईना. म्हणजे बाहेरच्या देशावर निघावयाच्या हुंड्याच्या पुरवठ्याचे मानानें हिंदुस्थानावर निघावयाचे हुंड्यांचे परिमाण अधिक झाले. ह्याचा अर्थ, हिंदुस्थानांत बाहेर पाठवावयाच्या पौडास मागणी वाढली व बाहेरची रुपयांविषयींची मागणी कमी झाली; व याचा साहजिक परिणाम असा झाला की, रुपयाची किंमत उतरली व पौंडाची किंमत चढली. म्हणजे एक पौंडास दहा रुपये हा जो भाव नुकताच सरकारने निश्चित केला होता, तो टिकेनासा होऊन पौंड म्हणजे १२, १५, १६ रुपये प्रमाणें तो उतरला. सरकारनें मध्ये पडून या देशांतून लंडनवर कोट्यावधी रुपयांचे नुकसान सोसून हुंड्या विकून हुंडणावळ पडूं न देण्याची शिकस्त केली, पण ती सर्व व्यर्थ जाऊन १९२१ च्या सुरवातीस ती एक रुपयास १ शिलिंग ३ पेन्स या दरावर आली म्हणजे एक पैडास १६ रुपये हे प्रमाण झालें. तेव्हां सरकारने हताश होऊन हुंडणावळ उचलून धरण्याचें धारेण सोडलें.
 कांहीं कालानंतर हिंदुस्थानचे व्यापाराची परिस्थिती हळू हळू अनुकूल होऊन रुपयाचा भाव पुनः चढू लागला, व १९२४ मध्ये तो १ शि. ४ पे. हलका झाला आणि सरकारास आपल्या चलन पद्धतीची पूर्ववत् घडी