पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कौन्सिल व रिव्हर्स कौन्सिल बिलें

३३

परदेशी देवघेवीस लागणारे तेवढेच सोनें लंडन येथील निधीमध्यें ठेऊन, त्याच्या बळावर पौंड व रुपया यांमधील नातें कृत्रिम रीतीनें कायम ठेव - ण्याचें घारेण सरकारनें अंगिकारलें, टांकसाळींत सोन्याचे नाणे पाडून देण्याची व्यवस्था करून राष्ट्राचें मुख्य नाणें व त्यांत असलेले सोने ह्यांची एकच किंमत कायम राखण्याची इंग्लंडमधील शुद्ध पद्धति टाकून देऊन, सोन्याच्या मोबदला रुपये व रुपयांच्या मोबदला लंडनवर हुंड्या देण्याची घेडगुजरी. पद्धत येथील सरकारने चालू केली. शेवटीं १९१३ साली चेंबरलेन कमिशननें असें मत दिले की, हिंदी लोकांना सोन्याच्या नाण्याचीं जरूर नाहीं; व तें आपणांस मिळावे अशी त्यांची इच्छाही नाहीं. नोटा आणि रुपये हेंच 'चलन' त्यांना सोईचें असल्यानें सोन्याचें नाणें प्रचारांत येणें हिंदुस्थानचे हिताचें नाहीं. अंतर्गत व्यवहारांत रुपये खेळत राहतील आणि हिंदुस्थानचे परराष्ट्रीय देणें भागविण्यापुरतें रुपयांचे परिवर्तन पौंडांत कर- ण्याची हमी सरकारने घेतली, म्हणजे पुरे. या पद्धतीस सुवर्णालंकृतानासि हेमालंकार वर्जिता" हे वर्णन बरोबर लागू पडते. कारण हिच्यामध्ये ही सुवर्ण परिमाण पद्धति असूनही लोकांस सोन्याचें दर्शन होत नाहीं, व चलनाधिकाऱ्यांकडून ते लागेल तेव्हां ( परदेशांतील मालाची किंमत देणें- करितां ) सोन्याचे ऐवजी 'परत हुंड्या' ( Reverse council bills ) मिळतात.
 वरील पद्धति ढांसळली- परंतु महायुद्धाचे काळांत हिंदुस्थानांतील मालाला विलायतेंत पुष्कळ मागणी येऊन पूर्वीचे आयात-निर्यातीच्या आंक- ड्यांचा परस्परांशी मेळ बसला होता, तो बिघडला; आणि अंतर्गत व्यवहारा• साठी लागणाऱ्या नाण्यांची तूट पडूं लागली. हिंदुस्थान सरकारने इंग्लंड- साठीं १९१४ ते १९१९ या मुदतीत २५ कोटि पौंड खर्च केला. यामुळे नाण्याची तूट जास्तच भासू लागली. याच सुमारास हिंदुस्थानांत चांदीची आयात कमी होऊन, सरकारला भारी दरानें चांदी विकत घ्यावी लागली, चांदीची किंमत १९१५ साली एक मसाला २७४ पेन्स होती, ती १९१७ साली ४३ पेन्स झाली, व रुपयांतील चांदीची किंमत जवळ जवळ रुपयाच्या कायदेशीर किंमती इतकी म्हणजे १ शिलिंग ४ पेन्स झाली.
 हिं......३