पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फौलर कामेटी १८९९

३१

आपले कापड अगर सूत चीन देशांत नेऊन विकलें, तर त्यास पूर्वी चीन देशचे लोक जी किंमत देत होते, त्यापेक्षां यानंतर ज्यास्त किंमत कां देतील १ पण चीन देशांतून जे चांदीचे चिनी नाणें इकडे आले त्याचे पूर्वी इतकें रुपये व्यापाऱ्याचे हात लागत नाहींसे झाले. कारण हैं चिनी नाणें चांदी- च्या भावानें जाणार आणि चांदी तर अगदी स्वस्त झालेली, तेव्हां आपल्या चीनचे व्यापारांत घट येऊ लागली.

" फौलर कमिटी १८९९ "

 पाश्चात्य देशांत सोन्या चांदीची 'दुहेरी मूल्यमापन पद्धति' पूर्वीच अव्यव- हार्य ठरली होती, आणि राज्य चलनपद्धति तर आतां अशक्य झाली, तेव्हा पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणें हिंदुस्थानांतहि सुवर्ण - चलन-पद्धति पूर्णत्वाने प्रचारांत येणें क्रमप्राप्तच होतें. म्हणून फौलर कमिटीनें शिफारस केल्यावरून १८९९ सालीं ब्रिटिश सुवर्ण-चलन म्हणजे सॉहरिन हिंदुस्थानचें मुख्य नाणें ठरवि- ण्यांत येऊन त्याचा व रुपयाचा परस्पर संबंध म्हणजे हुंडळावळीचा दर १६ पेन्स कायम झाला. त्याचप्रमाणे सोन्याची टांकसाळ येथे सुरू कर- याच्या पूर्व तयारीला सरकार लागून हिंदी चलनाचा प्रश्न एकदांचा काय- मचा सुटला, असें सर्वोस वाटूं लागलें.

"माशी शिंकली"

 पण थोड्याच अनुभवानें सरकारी अधिकाऱ्यांच्या असे लक्षांत आलें कीं, हिंदुस्थानांत सोन्याची टांकसाळ चालू न करतांहि भागण्यासारखे आहे. व्यापाराच्या ओघांत जरूरी पुरतें साव्हीरन प्रतिवर्षी देशांत येतच होते, आणि अंतर्गत व्यवहाराचे काम रुपये आणि कागदी नोटा ह्यांवर सुरळीत रीतीनें चाललें होतें. एका दृष्टीनें रुपया हे खुल्या टांकसाळीचे अभाव दुय्यम दर्जाचे नाणे असले तरी त्याचा उपयोग व्यवहारांत मर्यादित केलेला नव्हता; आणि म्हणून रुपया लंगडा असला, तरी सॉव्हरिनच्या बरोबरीने समाजांत वावरत होता. सॉव्हरिनच्या मोबदला ठराविक दरानें रुपये आणि नोटा देण्यास सरकार बांधले गेलें होतें. पण त्याच्या उलट रुपये आणि नोटा