पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
' हर्षोल कमिटी "

२९

परिस्थिति निर्माण झाली, याचे थोडे जास्त विस्ताराने विवरण करणे जरूर आहे.
 रुपयांत १६५ ग्रैन चांदी असते; व १६५ ग्रेन चांदीची बाजारात १६ पेन्स किंमत होत नव्हती, ती १३ पेन्स होत होती. परंतु सरकारच्या हुकुमाने कागदाच्या ज्याप्रमाणे एका तुकड्याल आम्ही दहा रुपये समजत व दुसन्या कागदाच्या तुकड्यास शंभर देतो; त्याप्रमाणेच १६५ ग्रेन शुद्ध चांदीच्या पत्र्यावर राणीचा मुखवटा व नांव असल्यावर त्याची किंमत १६ पेन्स धरावयाची, १६५ ग्रेन चांदीच्या रुपयास १६५ ग्रेन चांदीपेक्षां सामान्यतः बाजारात कधीहि जास्त किंमत येणार नाही, हे सरकारास माहीत होते; व म्हणूनच त्यांनी अशी योजना केली की, त्या वेळेपर्यंत ( १८९३ ) टांकसाळीतून ज्याप्रमाणे हवे त्यास रुपयाची चांदी अगर चांदीचे रुपये करून मिळत असत, त्याप्रमाणे यापुढे मिळणार नाहीत. चांदीच्या पत्र्यावर राजाचा अगर ःणीचा मुखवटा आणि अक्षरे वठविण्याचा अधिकार सरकारचा असतो, हा छाप वठवल्याखेरीज चांदीचा रुपया होऊ शकत नाहीं. तेव्हां सरकारने असे मनांत आण कीं, टांकसाळींत चांदीचे रुपये करून देण्याचे जर ओढून धरले, तर बाजारांत चांदी कितीहि असली तरी रुपये कमी पडतील; आणि रुपयाची कमतरता झाली म्हणजे चांदीचा भाव कोणताहि असला तरी रुपयाचा भाव वाढेल, कोणताह जिन्नस कमी पिकला म्हणजे त्याचा भाव चढतो, त्याप्रमाणे लोकांचे व्यवहार आहेत तसेच राहून रुपयांची संख्या कमी पडली तर रुपयांचा भाव चढलाच पाहिजे, अशा रीतीने रुपया महाग करून त्याची किंमत १६५ ग्रेन चांदीच्या बरोबर न ठेवता १६ पेन्सावर ठेविली, व टांकसाळींतून हवे त्यास चांदी घेऊन रुपये पाडून देण्याचे सरकारने बंद केले.
 ( १८९९ साली कायद्याने कायम केलेला रुपयांचा १६ पेन्स हा हुंडणावळीचा भाव रुपयांतील चांदीची किंमत १६ पैन्साचे आंत होती, तोपर्यंत सरकारास टिकवितां आला, परंतु १९१७ पासून चांदीचा भाव वाढत वाढत १९१९ मध्ये तो ५९ पेन्सास १ सइतका वाढला; तेव्हां रुपयांतील १६५ ग्रेन चांदीचा भाव सुमारे २१ पेन्सापर्यंत गेला. त्या वेळी