पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

उतरत्या हुंडणावळीमुळे सदर इसमास ४२५ रुपये जास्त खर्च करावें लागले.

" हषैल कमिटी : टांकसाळी बंद झाल्या ( १८९२) "

 गोया नोकरांचे वरीलप्रमाणे नुकसान होऊं लागलें, म्हणून त्यांनी जोराची चळवळ सुरू केली, अर्जावर अर्ज धाडले व खुद्द पार्लमेंटपर्यंत दाद लावली. शेवटीं स्टेट सेक्रेटरीस ( भारतमंत्र्यास ) ह्या प्रश्नाचा विचार करणें भाग पडून इंग्लंडचे त्या त्या वेळचे हाय चॅन्सेलर लॉर्ड हल ह्यांच्या अध्यक्षतेखाली ह्या प्रश्नाचा निकाल करण्याकरितां १८९२ साली एक कमिटी नेमण्यांत आली, तींत सर्व सभासद इंग्रज व अभिप्राय देणारेही सर्व इंग्रजच; तेव्हां हिंदुस्थानांतील लोकांच्या नफा नुकसानीचा त्यांचेकडून कांही विचार झाला नाहीं. मूठभर इंग्रज अधिकान्यांचे हित, तेंच हिंदी जनतेवें हित, असे भासवून त्यांनी त्याप्रमाणे शिफारस केली. या आपत्तीस तोड म्हणून हिंदुस्थानांत 'सुवर्णचलन' सुरूं करावें या उद्देशाने १८९३ साली टांकसाळीत रुपये पाडून घेण्याची नागरिकांना असलेली सवलत रद्द करण्यांत आली.
 यामुळे रुपया व त्यामधील चांदी यांच्या किंमतीमधील परस्पर संबंध कायम टिकविण्याचा मार्ग नाहींसा झाला; आणि रुपयाची सुवर्णानें मापलेली किंमत म्हणजे हुंडणावळीचा दर व्यवहारांत खेळणाऱ्या रुपयांची संख्या कृत्रिम रीतीनें मर्यादित करून हळूहळू १६ पेन्सापर्यंत वाढविण्यांत आली.
 येथपासून हिंदुस्थानांत या वेळपर्यंत चालू असलेली शास्त्रशुद्ध 'चलन- पद्धति ' जीस Automatic and self-adjusting system of Currency असं म्हणतात, ती नाहींशी होऊन, कृत्रिम चलनपद्धति ( managed Currency ) सुरू झाली. या दृष्टीनें हर्षल कमिटीच्या शिफारशीनुसार टांकसाळी बंद करण्यांत आल्या, ह्या गोष्टीस विशेष महत्त्व प्राप्त झालें आहे; कारण हल्लीं येथें चालू असलेल्या कृत्रिम चलनपद्धतीचा उगम यांत आहे; म्हणून टांकसाळी बंद झाल्यामुळे काय