पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चांदी घसरली व हुंडणावळ उतरली

२७

त्यानें सदर चांदी हिंदुस्थानांत पाठवून येथील टांकसाळीत रुपये पाडून घेऊन येथील देणें वारणें साहजीक आहे. याचा परिणाम असा झाला की, एका काळ प्रचलित असलेले १ रुपयास २४ पेन्स हें प्रमाण घसरत घसरत १३ पेन्सावर आलें. १८७३ ते १८९३ पर्यंत यामुळे सुमारें ८५ कोटि रुपयांची सरकारी जमाखर्चात तूट आली. परंतु कच्चा माल व धान्य यांस भाव चांगलाच आला. यामुळे हिंदुस्थानच्या प्रजेचें एकंदरीत नुकसान झालें नाहीं, पण ही हुंडणावळ अर्थात्व जास्त रुपये देऊन परराष्ट्रीय सोन्याची नाणी खरेदी करणारासच म्हणजे ज्यास परदेशी पैसे पाठविणें जरूर असेल अशासच नुकसानकारक होती. परदेशचे व्यापारी, युरोपियन अधि- कारी, खुद्द हिंदुस्थान सरकारास ही उतरती हुंडणावळ, जाचक होण्याचें कारण असें कीं, त्यांना इंग्लंडमध्यें प्रतिवर्षी कोट्यावधी रुपये - सेक्रेटरी ऑफ स्टेटच्या कचेरीचा खर्च, कर्जावरील व्याज, विलायती सामानाची द्यावी लागणारी किंमत, पेन्शनें, रजेवर गेलेल्या अधिकान्यांचे पगार इत्यादी- साठी-इंग्लंडास पाठवावयाचे असत, तेथें सुवर्ण चलन चालूं तर येथें रौप्य चलन चालूं. येथील सरकारास सर्व कर रुपयांत मिळत; आणि इंग्लंडमध्यें खर्च करतांना तो सोन्याच्या नाण्यांत म्हणजे पौंडांत करावा लागे. म्हणून हिंदुस्थान सरकारला पहिल्या इतकेच परदेशीं देणें देण्यास जास्त रुपये खर्चावे लागले. उतरत्या हुंडणावळीमुळे वरील परिस्थिती कशी निर्माण होते, हें खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल.
 ( टीप :- चांदीचा भाव १८७५ सालीं एक औंसास ५८ पेन्स होता, १८७९ सालांत ५२३, १८८८ त ४३ पेन्स १८९२ त ३७३ पेन्स १८९९ २७ पेन्स होता. १९३८ त ५१९ पेन्सचे आसपास )
 समजा, एखादा इंग्रज मनुष्य येथें नोकरीस आहे. त्याचा मुलगा इंग्लंडमध्येच शिकत आहे. त्यांस दरमहा ५० पौंड खर्चाला लागतात. हे ५० पौंड त्यास मिळण्याकरितां सदर इंग्रज मनुष्यास १ रुपयाचा २४ पेन्स भाव असतां ५०० रुपये पाठवावे लागत होते; त्याचे ऐवजी रुपयाचा भाव १३ पेन्स झाला असतां ९२५ रुपये पाठवावे लागत, म्हणजे या