पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

भारंभार रुपये सरकारी टांकसाळीतून पाडून दिले जातील, असे जाहीर झालें. तसेंच परदेशांत सुवर्णचलन पद्धतीमुळे चांदीस दुय्यमपणा आला. त्यामुळें चांदीची मागणी कमी होऊन तिच्या किंमतीत एक सारखा उतार होऊं लागला. तथापि हिंदुस्थानांतील रौप्य चलनपद्धति मात्र ठेंचा खात रखडत होती. पाश्चात्य देशाप्रमाणें येथेंही सुवर्ण चलनपद्धति सुरू करण्यांत यावी,अशी लोकांनी कित्येक वर्षे केलेली मागणी फैटाळण्यांत आली होती. परंतु ज्यावेळीं सरकारला स्वतःला व त्यांचे भाईबंधांना चाट बसूं लागली त्यावेळी, येथेंही सुवर्णचलन चालू करण्याची उपयुक्तता सरकारास पटू लागली.

चांदी घसरली व हुंडणावळ उतरली.

 चांदी स्वस्त झाल्यामुळे हिंदुस्थानचे निर्गत मालाचे बाबतींतलें देणें व्यापारी लोक चांदी इकडे आणून तिचे सरकारी टांकसाळीत रुपये पाडवून घेऊन देऊं लागले. याचा परिणाम असा झाला की, चांदीचे रुपये व परराष्ट्रांतील सोन्याची नाणी ह्यांचा परस्पर मूल्य संबंध सारखा बदलत जाऊन २४ पेन्सावरून १३ पेन्सापर्यंत रुपयाचा भाव उतरला. आपण मार्गे पाहिलेच आहे की, देशादेशांतील येणें-देणें हुंडीच्या रूपानें होतें. याचें मुख्य कारण म्हणजे इतर कोणत्याही मार्गापेक्षां हा मार्ग कमी खर्चाचा पडतो, हैं होय. परंतु वर वर्णन केलेल्या वेळी म्हणजे एकोणिसावें शतकाचे चतुर्थ पादांत अशी परिस्थिती उत्पन्न झाली की, हुंडणावळ फारच महाग पहूं लागली व त्यापेक्षां चांदीच या देशांत पाठविणें परदेशी व्यापान्यांस फायद्याचे होऊं लागलें. उदाहरणार्थ, इंग्लंडमधील एका गिरणीचे कारखानदाराने येथून दहा हजार रुपयांच्या किंमतीचा कापूस खरेदी केला, त्यास त्याबद्दल इकडे पैसे पाठविणें आहेत. त्याने जर हुंडणावळीचा मार्ग स्वीकारला तर त्यास १ पौडास १० बानें एक हजार पौंड द्यावे लागले असते. परंतु बाजारांत चांदीचा भाव रुपये, या हिशे- इतका स्वस्त होता की, दहा हजार रुपये पाडण्यास लागणारी चांदी त्यास लंडनचे बाजारांत ५५० ते ६०० पौंडास मिळू लागली. तेव्हां