पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चैक म्हणजे काय ?

१७

योजना करितां येते; ज्याला रकम मिळावी अशी त्याची इच्छा असते त्याचे नांव लिहून खाली सही केली म्हणजे झाले.
 हुंडीची रक्कम ज्या इसमास मिळावयाची असते, त्याने ती हुंडी एकदा सत्कारून आणली म्हणजे कोणच्याहि नांवाचा शेरा लिहून त्यास ती दुसन्यास विकता येते, व तो विकत घेणारा पुन्हा शेरा लिहून ती हुंडी इतरांना विकू शकतो, अशा रीतीने एका मागून एक वाटेल तितके शेरे मारतां येतात. या रीतीने हुंड्यांच्या योगाने राष्ट्रीय चलनांत भर पडते.
 हुंड्यांची पद्धति हिंदुस्थानांत फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. प्रवास करणे पूर्वी फार धोक्याचे असे. तेव्हा अशा प्रसंगी मोठ्या पतवाल्या सावकाराकडे रकमा ठेऊन त्यांचेकडून हुंड्या घेऊन, जरूर तेव्हां त्यां३ पैसे वसूल करता येत. म्हणजे हल्लींच्या प्रवाशांना ज्याप्रमाणे बँका वेगवेगळ्या शहरी रकम मिळण्याची सोय ड्राफ्टल वगैरेनी व्हावी अशी योजना करतात,तीच सोय हुंड्यांचे योगाने पूर्वी होत असे, असे म्हणावयास हरकत नाहीं.
 पेढीवाल्यांच्या हुंड्या, देणी-घेणी भागवण्याकरितां व कर्ज काढण्यासाठी, त्याचप्रमाणे दुस-या ठिकाणी रकमा पाठविण्यासाठी, मुख्यतः काढलेल्या असतात; त्यांच्या पाठिमागे मालाचे तारण असतेच असे नाहीं. मालाचे तारणावर काढलेल्या हुंड्यास * ट्रेडबिल्स' असे म्हणतात, व केवळ पैशाची देवघेव करण्यासाठी काढलेल्या हुंड्यास ** फिनन्सबिल्स ) असे म्हणतात. बँका ‘ट्रेडबिल्स विशेष पसंत करतात, कारण मालाच्या विक्रीची किंमत उगवण्यासाठी काढलेल्या हुंड्यांच्या मागे कालांतराने विकला जाणारा माल असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा भरीवपणा असतो; तसा दुस-या प्रकारच्या ( फिनन्सबिल्स ) हुंड्यामध्ये नसतो; आणि त्यांचा उपयोग संपत्तीच्या उत्पादन व चलन अशा कामाकडे केला जाईल अशी खात्री नसते.

" चेक म्हणजे काय ? व व्यवहारांत त्याचा उपयोग”

 राष्ट्रीय मध्यवर्ती बँका कागदी चलन काढून देशांतील देवघेवात सुलभता