पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

मध्यवर्ती बँकेनें करणें श्रेयस्कर असतें. सामान्य बँकांस योग्य मर्यादेत रोखीची शिल्लक ठेवावी लागते, तिच्यामध्ये मध्यवर्ती बँकेच्या पाठिंब्यामुळें बचत करतां येते. नोटा काढण्याच्या सवलतीमुळे मध्यवर्ती बँकेचें ह्या विषयचें सामर्थ्य दांडगे असतें. ठेवींच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेले निरनिराळे 'रिझव्र्ह ' व नोटाबद्दल रोकड देतां यावी म्हणून आवश्यक असलेला 'रिझर्व्ह' यांचे एकंदर परिमाण कमीतकमी व्हावे, म्हणून दोन्ही एकाच संस्थेच्या हुकमतीखाली असणें सोईचे असते. शिवाय देशांतील चलनाच्या टंचाईबर व मुबलक प्रमाणावर बँकांच्या व्याजाचे दर अवलंबून असल्याकारणानें जर चल्न निर्माण करणें व त्यावर सत्ता चालविणें हें काम एका संस्थेकडे व व्यापारी कर्जाचा दर म्हणजे “बँकरेट" ठरविणें दुसन्या संस्थेकडे असेल, तर त्या दोन्हींचा मेळ नीट बसणार नाहीं. हीं दोनहि कायें हल्लींच्या गुंतागुंतीच्या आर्थिक रचनेमध्ये एका संस्थेकडेच असणें अगत्याचे आहे. मध्यवर्ती बँका हीं दोन्हीं कार्ये करतात.

" कागदी चलनांत हुंड्यांचें स्थान "

 'हुंडी' हैं एक धनकोनें रिणकोस लिहिलेले पत्र असते; व त्यामध्यें लिहि- लेली रक्कम रिणकोनें एका ठराविक इसमास ठराविक वेळी द्यावी अशी घनकोनें आज्ञा केलेली असते. हुंडी ही लेखीच असली पाहिजे व तीत रक्कम देण्याचा हुकूम अगदीं बिनशर्त असला पाहिजे. एखादी अट क्वचित् नमूद केली असल्यास ती अट केव्हांतरी पार पडेलच अशी शक्यताच नव्हे तर खात्री पाहिजे. ज्याला रक्कम मिळावी असें लिहिलेले असेल त्यानें हात हुंडी येतांच जो पैसे देण्यास बांधलेला असेल, त्याचेकडे जाऊन तिच्यावर सही मिळविली पाहिजे. ती सही हुंडीचा स्वीकार होऊन सही करणारा योग्य वेळीं रक्कम देण्यास तयार असल्याचे द्योतक वचन आहे. उ० "अ" ने काढलेली हुंडी "ब" नें स्वीकारली म्हणजे त्यानें सही करून रक्कम देण्याचे कबूल केलें, म्हणजे ती 'हुंडी स्वीकारली,' असे म्हणतात. ज्याला रक्कम मिळावयाची त्याचें नांवापुढे असले तर त्याला वाटेल त्या इसमास हुंडीची रक्कम मिळावी अशी or order' असे शब्द असेल तर त्याला वाटेल त्या इसमास हुडीची रक्कम मिळावी अशी