पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
द्विनपद्धति

११

जनतेस असते, व देशांत प्रचलित असलेल्या इतर घातूंच्या नाण्यांचा, ज्या नाण्याचा अमूक इतका हिस्सा असें प्रमाण बांधलेलें असतें, आणि जें कर्ज- फेडीचे कायदेशीर व अमर्याद ( Unlimited ) चलन मानले जाते, तें नाणें त्या देशाचे मुख्य नाणे समजलें जातें.
 उपनाणे (Token Coin): - ज्या नाण्याची कायदेशीर किंमत त्यांतील असलेल्या धातूच्या किंमतीपेक्षां अधिक असून, ती धातू सरकारी टांकसाळीत नेऊन देऊन ठराविक वजनाचीं नाणी पाडून घेण्याची सवलत जनतेस नसतें, व जे नाणें दुसन्या एखाद्या नाण्याचा अमूक इतका हिस्सा असें समजलें जातें, आणि कर्जफेडीत व इतर देवघेवीत जे ठराविक मर्यादेबाहेर नाकरतां येतें, त्यास त्या देशातील उपनाणें असें म्हणतात.

" द्विचलन पद्धति "

 साध'रणतः १४ व्या शतकापासून १९ सार्वे, शतकाचे सुरवातीपर्यंत सोने व चांदी या दोनही धातूंचा मुख्य चलन म्हणून उपयोग युरोपमध्यें करण्यांत येत होता. सोन्याचीं व चांदीचीं मुख्य नाणीं एकदम चालू होती. व त्यांचा परस्पर संबंध कायद्याने ठरविलेला असे. प्रत्येक देशामध्ये द्विचलन पद्धतींतील या दोन चलनामधील परस्पर संबंध वेगवेगळ्या प्रमाणांत ठर- विद्याकारणानें व आज सोन्याची नाणी जास्त पाहून तर उद्या चांदीचीं जास्त काढून हे प्रमाण कायम न ठेवतां आल्यामुळे भयंकरच घोटाळा माजूं लागला.
 अठराव्या शतकांत इंग्लंडाचा व्यापार जंगभर पसरून त्याची भरभराट झाली व त्यामुळे इतर देशांतून इंग्लंडमध्यें सोन्याची आयात फारच झाली, आणि म्हणून इंग्लंडला सोन्याचेच चलन सुरू करावें व चांदीचें नाणें उप- नाण्यांत काढावे अशी इच्छा झाली. त्याप्रमाणें इंग्लंडने १८१६ साली सुवर्णचलन सुरू केले. पुढे १८७१ चे सुमारास जर्मनीला फ्रान्सकडून, (फँ को - जर्मन युद्धामध्ये फ्रान्सचा पराभव होऊन जर्मनीचा विजय झाल्या. मुळें ) बरीच मोठी रक्कम खंडणी म्हणून मिळाली, त्यामुळे जर्मनीसही आपण इंग्लंडप्रमाणे सुवर्णचलन सुरू करावें असें वाटू लागलें, म्हणून