पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाण्याचे बाजारभावावर होणारे परिणाम

बाजारांत पूर्वीप्रमाणें एका पौंडास फक्त है औसच सोनें मिळू लागेल; म्हणजे शेवटी इंग्लंडमध्ये ८००० पौंडाची नाणी खेळती राहतील, व अशा रोतीने पौंडांतील सोन्याच्या मोलाचे प्रमाण बाजारांतील ! भैंस सोन्याच्या मोलाच्या बरोबर राहील.
 उलटपक्षी इंग्लंडमध्ये कांहीं कारणानें पूर्वी असलेला १००० औँस सोन्याचा सांठा कमी होऊन तो ५०० औसावर उतरला, परंतु पौंडाचें नाणें मात्र ४००० च कायम राहील तर, ८ पौंडास एक औंस सोनें अर्से -प्रमाण पडेल, म्हणजे पौंडांत असलेल्या औस सोन्याला बाजारांत है औस " सोने मिळू लागेल; अर्थात पौंड जवळ बाळगणेंपेक्षां सोनें घातूच जवळ असणे फायद्याचे दिसतांच लोक ताबडतोब पौंड टांकसाळींत नेऊन वितळ• वून त्याचे सोने करतील व बाजारांत विकतील. पौंड इतके अटविले जातील की शेवटीं १ पौंडांतील औस सोन्यास बाजारांत औस सोनें मिळू लागेल, म्हणजे त्यावेळी देशांत फक्त २००० पौंडच नाणें शिल्लक राहील, व अशा रीतीनें पौंडाच्या नाण्यांतील सोनें धातूचे मोल बाजारांतील सोनें धातूच्या मोलाचे प्रमाणांत राहील.

" मागणी व पुरवठा या न्यायानें ( Demand and Supply ) नाण्याच्या किंमतीतील चढउताराचे बाजारभावावर होणारे परिणाम "

 गहूं, तांदूळ वगैरे जिन्नस ज्याप्रमाणे स्वस्त अगर महाग होतात, तोच न्याय ज्या धातूंचें नाणं केलें असतें त्यास लागू आहे. परंतु ही धातू - अर्थात् त्या धातूचें नाणें - स्वस्त झाले म्हणजे नाणेंच स्वस्त झालें असें न म्हणतां एकंदर पदार्थमात्रांची किंमत वाढली असें म्हणणें लोकांस सोईचें व समजुन ती पडते. सर्व पदार्थांची किंमत नाण्यांत करतात आणि नाणेंच स्वस्त झाले ऊर्फ पुष्कळ झाले म्हणजे सर्व पदार्थाबद्दल किंमतीच्या रूपाने त्या त्या पदार्थाचे मालकास पुष्कळ नाणे मिळू लागतें. कोणत्याही पदार्थास पुष्कळ नाणे द्यावे लागले म्हणजे तो पदार्थ महाग झाला, असे म्हणण्याचा प्रघात आहे. नाणें स्वस्त झाले म्हणजे सर्वच पदार्थास पुष्कळ नाणें द्यावें