पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदी चलनपध्दतीचा इतिहास

 या अडचणींतून सहजरीतीनें पार पडणेंकरितां, नाण्यांचा पुरवठा लोकांच्या गरजेप्रमाणे बिनहरकत कमीजास्त होऊं देणें हा मार्ग आहे.
 ठराविक वजनाचें सोर्ने किंवा चांदी दिली असतां, सरकारने आपल्या टांकसाळींतून ठराविक नाणीं बिनतक्रार पाडून देणें आणि बाजारांत सदर धातूंस जास्त भाव आल्यास नाणी वितळण्याचा हक पूर्णत्वाने लोकांस असर्णे, ह्या दोन प्रकारच्या योजनेनें नाण्यांतील धातूच्या मोलाचे प्रमाण बाजारांतील धातूच्या मोलाशीं कायम राखता येते. ( या चलन पद्धतीस Automatic and self-adjusting system of currency a म्हणतात ) हैं खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल.
 ( अर्थशास्त्राचें एक तत्व असें आहे की, सोनें धातू किंवा रुपें यांचा सांठा कमीजास्त होण्याने बाजारभावांत फ क होत नाहींत. त्यांची धातू नाण पाडून तीं देशांत खेळूं लागलीं म्हणजे त्याच्या कमीअधिकपणानुसार बाजारभावांत ( पुरवठा व मागणी कायम असतां ) चढउतार होतात. इंग्लंडमध्यें सुवर्णं चलन चालू होतें, त्यावेळी एका पौडांत सुमारें है औस सोनें धातू असे ( १ औंस सोनें टांकसाळींत अगर बँक ऑफ इंग्लंडमध्यें दिले असता ३ पौंड १७ शिलिंग १०३ पेन्स मिळत असत, पण येथें उदाहरणाच्या सोईकरितां १ औंस सोनें घातू म्हणजे ४ पौंड असें प्रमाण धरले आहे. )
 उदाहरणाच्या सोईसाठीं आपण असे समजूं, कीं, सोन्याशिवाय इंग्लंडांत दुसरा पदार्थच नाहीं, व तेथें १००० ऑस सोनें धातू असून ४००० पौंडाचे नाणें आहे. तेव्हां १ औंस सोन्यास ४ पौंडाचे नाणें हें प्रमाण बसतें, म्हणजे १ पौंडांत ४ औंस सोनें धातू हैं प्रमाण बसलें.
 परंतु इंग्लंडमध्यें कांहीं कारणांनी सोन्याचा सांठा वाढून तो २००० औस झाला, व पौंडाचे नाणे मात्र ४ हजारच कायम राहिलें; तर २ पौण्डास १ औंस सोनें बाजारांत मिळू लागेल, म्हणजे पौंडांतील : आँस सोन्यास बाजारांत ई औस सोनें मिळू लागेल. परंतु अशी स्थिति कायम राहणें शक्य नाहीं. फायद्याच्या आशेने लोक आपल्याजवळचें सोनें सर- कारी टांकसाळींत देऊन पौंडाचे नाणे पाडून घेतील, तें इतकें कीं, शेवटी