पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
धातुमय चलनांतील अडचण

चलन म्हणून उपयोग करण्यांत येत होता,त्या चलन पद्धतीनें आपल्या अगदी साध्या गरजाही भागविणें कठिण झालें असतें.
 भारी किंमतीचीं व मुख्य नाणीं सोने व चांदी ह्या धातूंचीं, व किर- कोळ व्यवहारासाठी तांच्यासारख्या हलक्या धातूंचीं, अशी व्यवस्था साह- जिकच प्रचारांत आली; व त्यामुळे सर्व प्रकारच्या देवघेवीत सुलभता प्राप्त झाली.

धातूमय चलनांतील अडचण

 परंतु चलन, हैं एकप्रकारचें माप असल्यामुळे तें सोन्या चांदीचें केल्यानें थोडीफार अडचण उत्पन्न होणेचा संभव असतो. शेर, फूट किंवा तोळा असली वजने व मापें कोणत्याही पदार्थाची बनविली तरी बिघडत नाहीं. फूट लोखंडी असला काय किंवा लांकडी असला काय सारखेच. त्याच्या कार्यक्षमतेत फेर होत नाहीं. धातूच्या नाण्यांचें मात्र असें नाहीं, तीं इतर पदार्थांचे मूल्य दर्शविण्याचे काम करीत असत, म्हणजे दुसन्या जिनसांची नाण्याच्या मूल्याशी तुलना होत असतां, खुद्द नाण्याचे मूल्य कमी जास्त होण्याचा संभव असतो. याचें कारण असें कीं, सोने, चांदी, तांबे ह्या धातू खाणींत सांपडतात. एखादे वेळी एखादी सोन्याची, चांदीची, किंवा तांब्याची एक अगर अनेक खाणीं सांपडल्या, तर आपणास पाहिजे त्यापेक्षां सदर घतूंचा पुरवठा अधिक होणेचा संभव अहे. उलट- पक्षी व्यापारधंदा भरभराटीत आला असतां, सदर धातूंच्या अस्तित्वांत असणान्या खाणींतून आपणास जरूर तितक्या प्रमाणांत धातू न निघाल्यास व नवीन खाणी न सांपडल्यास, पुरवठा कमी पडणेचा संभव असतो. शिवाय सोनें आणि चांदी या धातूंचा दागिने, भांडी, वगैरे जिन्नस करणेकडे उप योग होत असतो. म्हणून सदर धातूंचा पुरवठा व त्यास असणारी मागणी याच्याप्रमाणें सदर धातूंचें मूल्यांत चढउतार होणें स्वाभाविक आहे. आणि त्या चढउतारांचा परिणाम त्यापासून बनविलेल्या नाण्यांच्या मूल्यांत होणें अपरिहार्य आहे.