पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदी चलनपध्दतीचा इतिहास

घेतां येऊ लागली. धातूंचा चलनासारखा उपयोग फार प्राचीन कालापासून झालेला आढळतो. वेदांतही नाण्यांचा "निष्क" ह्या शब्दाने उल्लेख आहे. परंतु लायकरगसाचे वेळी लोकांस धातूंचीं नाणीं माहीत होतीं, याबद्दल दुमत नसल्यामुळे धातूंचे नाणें निदान तीन हजार वर्षापासून तरी कांहीं देशांत चालू होतें असें दिसतें.
 प्रारंभी सोने, चांदी, तांबे यांचे तुकडेच उपयोगांत आणीत आणि प्रत्येक वेळी त्यांचे वजन करून घेत. दरवेळी वजनाचा खटाटोप आणि तुकड्यांतील सोनें अगर चांदी शुद्ध आहे कां नाहीं हें समजण्याची अड चण या दोन कारणामुळे या पुढील सुधारणा म्हणजे ठराविक वजनाची नाणी प्रचारांत आली, ही होय. यापुढे अगदी लहान सहान व्यवहारही सुलभतेने करतां येऊं लागले. त्यावरील सरकारी शिक्यामुळे नाण्यांस लौकिक मान्यता तात्काळ प्राप्त होऊन, त्याच्या उपयोगापासून जी सोय झाली, ती सर्वांच्या इतकी आंगवळणी पडली, कीं, नाण्यावांचून व्यवहार शक्यच नाहीं, अशी सार्वत्रिक समजूत झाली आहे.

" धातूमय चलनापासून झालेली सोय "

 आपण गिरणीतून एक वार कापड चार आण्यास विकत घेतले, तर आपणास आढळून येईल, की, तयार करण्यासाठी कापून देशाच्या दूर- दूरचे भागांतून आला, व रंग जर्मनीहून आला. व कारखान्यांची यंत्रे इंग्लंडहून आली, म्हणजे एक वार कापड करण्यासाठी हजारों, लाखों लोकांची मदत लागली, व या सर्वांना वेतन आपण दिलेल्या चार आण्यां- तून मिळाले.
 ह्या रीतीनें धातूंच्या चलनानें देवदेवीस इतके सहाय्य झालें कीं, आपल्या चार आण्याचे लहान लहान असंख्य भाग करून ते वेग- वेगळ्या ठिकाणच्या असंख्य लोकांना वाटतां आले. हो सोय धातूंच्या चलनाचा उपयोग जादूसारखा होऊनच झाली. प्राचीन काळच्या ऐनजिनसी विनिमयानें अगर धातूशिवाय इतर पदार्थाचा