पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
होमचार्जेस

९१

 होम चार्जेसच्या प्रत्यक्ष खर्चाचा बोजा १८५८ सालापासून आतांपर्यंत ८० वर्षात हिन्दी जनतेवर किती बसला याचा विचार वरील आंकड्यांत आपण केलेला नाहीं. फक्त होमचार्जेसची रक्कम पौंडांत पाठविण्याकरितां रूपये कमी लागावे म्हणून हुंडणावळ विषयक कृत्रिम घोरण ठेवल्यामुळे व चांदीचा भाव घसरल्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा हिन्दी जनतेवर बोजा किती बसला याचाच विचार यांत झाला.
 थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे मोंगल राजे हिंदुस्थानलाच मायदेश समजत तर इंग्रज हिन्दुस्थानकडे " चरण्याचे एक कुरण" या दृष्टीनें पाह- तात, म्हणून या दोघांच्या हिन्दुस्थानच्या चलनविषयक धोरणांत दक्षिण-उत्तर वाइतकें अंतर दिसतें.
 असो, येथपर्यंत केलेल्या विवेचनाचें सार एका वाक्यांतच सांगावयाचें झाया तें असें सांगता येईल की "हिंदी चलनपद्धतीचा इतिहास म्हणजे इंग्लंडने हिंदुस्थानांतून केलेल्या कायदेशीर लुटीचाच इतिहास होय. "



समाप्त