पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
हिंदी चलन पद्धतीचा इतिहास

हित साधण्याकरितां महायुद्धापूर्वी ( १९९४ साल ) प्रचारांत असलेल्या चलनाच्या किंमती उतरविल्या तर हिंदुस्थानांत महायुद्धापूर्वी १९१४ साल प्रचारांत असलेला हुंडणावळीचा दर १६ पेन्स तर १९९९ साली २४ पेन्स ! हा २४ पेन्साचा दर न टिकवितां आल्यामुळे पांच चार महिन्यां- तच सोडावा लागला तरी त्यापासून कांहीं घडा सरकारने घेतला असेल म्हणावें तर १९२७ सालीं जो दर कायद्यानें कायम केला तो १८ पेन्स ( म्हणजे १९१४ सालापेक्षा अधिकच ) असें कां, तर इंग्लंडला कच्चा माल येथून इतर देशापेक्षां स्वस्त मिळाला पाहिजे व इंग्लंडचा पक्का माल येथें अधिक खपला पाहिजे ! त्यांत येथील शेतकरी, मजूर व कारखानदार मेले काय किंवा जगले काय सारखेंच ?
 १९३१ सप्टेंबरमध्ये इंग्लंडने आपल्या चलनाचा सुवर्णार्शी असलेला संबंध सोडला तसा रुपयाचाही सुवर्णीशी असलेला संबंध तुटला. परंतु रुपयास इंग्लंडच्या चलनाप्रमाणें मोकळे न सोडता, तो पारतंत्र्यांत खितपत पडलेल्या राष्ट्राचें चलन आहे हे जणू काय सिद्ध करण्याकरितांच त्याचे नाते स्टर्लिंगशी जोडण्यांत आलें. इंग्लंड व हिंदुस्थान यांचे हितसंबंध परस्पर विरुद्ध आहेत. इंग्लंड बऱ्याच राष्ट्राचे धनको तर हिंदुस्थान इंग्लंडचे ऋणको. कच्चा माल व धान्य शक्य तितकें स्वस्त मिळण्यावर व पक्का माल शक्य तितका परदेशीं अधिक खपण्यावर इंग्लंडचें हित अवलंबून तर कच्चा माल धान्य यांना अधिकाधिक किंमत येण्यावर व कापड वगैरेसारखा देशात तयार होणाऱ्या मालास परदेशी मालाची स्पर्धा न होण्यावर हिंदी जनतेचे हित अवलंबून, अशी परस्पर भिन्न परिस्थिति असतां इंग्लंडच्या चलनाशी ( स्टर्लिंगशी ) हिंदुस्थानच्या रुपयाचें नातें जोडण्यांत इंग्लंडच्या हिताच्या दृष्टीशिवाय दुसरा हेतु काय असणार ? इंग्लंडचें हित म्हणजे हिंदुस्थानचें नुकसान, व हिंदुस्थानचे हित म्हणजे नुकसान, असें हें समीकरण आहे. तेव्हां ज्याच्या हातांत ससा तो पारधी, या न्यायाने हिंदुस्थानवर इंग्लंडची राजकीय सत्ता असल्यामुळे इंग्लंड आपलेच हित पहाणार व त्यांत आपलें नुकसान होणार, हे उघड़ आहे.