पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण सातवें
उपसंहार

 होमचार्जेसची पाठवावयाची रक्कम, सरकारी व बिनसरकारी गोय नोकरवर्गास आपल्या नातेवाईकांस पाठवावी लागणारी रक्कम, ब्रिटिश भांड- चलदार वर्गानें हिंदुस्थानांत गुंतविलेल्या भांडवलावर सुटणारे व्याज व नफा या नात्याने इंग्लंडला प्रतिवर्षी हिंदुस्थानांतून पाठवावी लागणारी रक्कम, व कच्चा माल आणि धान्य इंग्लंडला इतर देशांतील भावाच्या मानानें स्वस्त पडणें व इंग्लंडच्या पक्क्या मालास येथील बाजारपेठ निर्बंध खुली राहणें, या गोष्टी नजरेपुढे ठेऊन, यांस पोषक असें हिंदीचलन व हुंडणावळ विषयक धोरण आतांपर्यंत कसें चालत आलेले आहे, हें वरील विवेचनावरून दिसून येईल.
 एकोणिसावे शतकाच्या चतुर्थपादांत (१८७०१९००) पाश्चात्य राष्ट्रांनी चांदीचा मुख्य चलन म्हणून उपयोग करण्याचे सोडलें व सुवर्णचलन सुरू केले म्हणून चांदीचा भाव फारच घसरला व सोन्याचा भाव चढला. येथे रौप्य चलन सुरू तर इंग्लंडांत सुवर्णचलन सुरू. त्यामुळे परराष्ट्र हुंडणावळीचा (Exchange) रुपयाचा २४ पेन्साचा दर १३ पेन्सावर आला, त्यामुळे येथून इंग्लंडला ज्यांना पैसे पाठवावयाचे होते त्यांचें नुकसान होऊं लागलें. ( या उतरत्या हुंडवणावळीमुळे हिंदी जनतेचें कांहीं नुकसान नव्हतें. फक्त होमचार्जेसकरितां पूर्वीपेक्षां यावेळी जास्त रक्कम पाठवावी लागल्यामुळे १८७३ ते १८९३ या मुदतीत सुमारे ८५ कोटि रुपये जास्त खर्च झाले येवढेंच! परंतु येथील गोन्या लोकांचे त्यांत नुकसान फार होऊं लागलें हैं। आपण मार्गे पाहिलेच आहे. ) म्हणून १८९३ सालीं टांकसाळी बंद झाल्या, व रुपयाची किंमत चांदीचे किंमतीवर अवलंबून न राहतां ती ब्रिटिश पीडाचा अमूक इतका हिस्सा समजावयाची, अशा रीतीनें हिंदु-