पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चढत्या हुंडणावळीचे दराने हिंदुस्थानचें नुकसान

८३


सर्वांत मोठे संकट म्हणजे जपानने आपल्या नाण्यांची किंमत सुमारे ५०टक्कयांनी उतरविल्यामुळे तेथील माल येथे फारच स्वस्त येऊन पडू लागला हे होय. आणि त्यांतून हिंदुस्थानचा निभाव लागणेस आपल्या चलनाची किंमत उतरविणे भाग आहे.त्याशिवाय कारखाने चालण्यास कठीण झाल्यामुळे मजूरवर्गाची परिस्थिति सुधारण्याचा प्रश्न समाधानकारक रीतीने सुटणे शक्य नाही,असे तज्ज्ञांचे मत आहे.