पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/९६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] वेदांत व हक्क. ९१

हक्काने तुम्हांस प्राप्त झाला आहे; मग आणखी वेगळे हक्क ते कशाचे मागतां ? आपला खास दूत असा ताम्रपट देऊन परमेश्वराने या भूलोकावर कोणासही पाठविले नव्हते, सध्या पाठविले नाही, आणि पुढेही तो कोणास पाठविणार नाही. तसेंच तो कोणाला पाठवील ही गोष्ट शक्यच नाही. लहानथोर सारे प्राणी त्याच परमात्म्याचे अवतार आहेत. त्यांत कमी अधिक स्पष्टीकरणाचा मात्र फेर आहे. अनंत कालापासून एकच संदेश परमेश्वराकडून मनुष्यजातीला मिळत आला आहे. हा संदेश हळुहळू सर्वांस प्राप्त होत आहे. प्रत्येक प्राण्याच्या हृदयांत हा संदेश परमेश्वराने स्वहस्ते लिहून ठेवला आहे, आणि तोच स्पष्ट दशेला आणण्याची धडपड प्रत्येक प्राणी करीत आहे. कोणाला बरीशी संधी मिळाली म्हणजे हा संदेश अधिक स्पटपणे तो जाहीर करतो आणि दुसरा एखादा तशा संधीच्या अभावी स्वस्थ बसलेला असतो. तथापि परमेश्वराचा दूतपणा सर्वांनाच मिळाला आहे. परमेश्वराचा दूत नाही असा कोणीच नाही. मग मी श्रेष्ठ, तो कनिष्ठ, हा क्षुद्र, तो थोर हा भेद कोठे राहिला ? याकरितां अशा प्रकारचे सारे विशेष हक्क समूळ नष्ट करून टाकणे हे अद्वैताचे कार्य आहे. सर्व कार्यात अत्यंत दुर्घट असे एखादें कार्य असेल तर ते हेच आहे. आणि सर्वांत मोठी चमत्काराची गोष्ट ही की ज्या भूमीत अद्वैत मताने जन्म घेतला तेथे या कार्याची हेळसांड जितकी होत आहे तितकी ती दुसऱ्या कोठेही होत नसेल. फार काय, पण हक्कांचे खूळ अतिरिक्तपणे जर कोठे वावरत असेल तर तें अद्वैताच्या माहेरघरीच होय. असल्या प्रकारचे सुलतानी हक्क तेथील धर्मगुरूंना आणि उच्चवर्णीयांस आहेत. हिंदुस्थानांत पैशाचे प्राबल्य मोठे नाही. नुसत्या पैशाच्या बळावर असे हक्क तेथे कोणास प्राप्त होत नाहीत, हे तरी त्यांतल्या त्यांत वरें आहे असे मला वाटते, पण अमुक विशिष्ट कुलांत जन्म झाला म्हणून, अथवा अमुक पंथाचा गुरु अथवा मठाचा प्रमुख म्हणून असे हक्क मात्र सर्वत्र प्राप्त होत असतात.

 वेदान्त तत्त्वाच्या पायावर उभारलेल्या नीतीचा प्रसार करण्याचा प्रचंड यत्न एका काळी हिंदुस्थानांत झाला होता, आणि बराच काळपर्यंत तो मोठा यशस्वीही झाला होता आणि हिंदुस्थानच्या इतिहासांत हा काळ अत्यंत भरभराटीचा व उज्ज्वल होता हेही आपणांस ठाऊक आहेच. भगवान् बुद्ध