पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] वेदान्त व हक्क. ७७

वेदान्त व हक्क.

 अद्वैत वेदान्तापैकी सूक्ष्मेंद्रियशास्त्राचा विचार आपण बहुधा पूर्णपणे केला आहे. आता एकाच मुद्याचे विवेचन करावयाचे आहे, आणि हाच मुद्दा लक्ष्यांत येण्यास फार कठीण असा आहे. ' एकमेवाद्वितीयम् ' असें जें कांहीं आहे त्यापासून उत्क्रांतिद्वारा आपणाभोंवतालचे सारे विश्व निर्माण झालें आहे हा वेदान्तशास्त्राचा सिद्धांत आपणास आठवत असेलच. किंबहुना, हे सारे विश्व एकमेवाद्वितीयापासून निर्माण झाले असे म्हणण्यापेक्षां तें एकमेवाद्वितीयच उत्क्रांत होत होत विश्वरूपाला आले असें वेदान्ताचे म्हणणे आहे. या एकमेवाद्वितीयाला ब्रह्म अशी संज्ञा वेदान्तशास्त्राने दिली आहे. तें केवलरूप आहे. कोणत्याही पदार्थांच्या मिश्रणाने झालेले नाही. हेच केवलरूप सृष्टि या रूपाने प्रत्ययास येत आहे. हे घडले कसे ? केवलरूपांत ही एवढी घडामोड कोणी घडवून आणली ? वेदान्ताच्या साऱ्या विचारसरणींत अत्यंत अवघड अशी जागा ती हीच. केवलरूपांत घडामोड व्हावी हे आधी शक्य तरी आहे काय? बोलून चालून तें केवलरूप. तें अमिश्र आहे, अनंत आहे, अमर्याद आहे अशा प्रकारच्या त्याच्या व्याख्या तुम्हीच सांगतां; मग त्यांत बदल कशानें, कसा आणि कां व्हावा ? हे रूप बदलण्यास पात्र नाही, त्याअर्थी त्यांत बदल घडणे शक्य नाही. याकरितां त्यांत बदल झाला असे तुम्ही म्हटले की तुमच्या स्वतःच्या बोलण्यांतच हा उघड विरोध उत्पन्न झाला. पृच्छकाने उभी केलेली ही अडचण मोठी विलक्षण आहे खरी. आतां व्यक्तिविशिष्ट परमेश्वराचे अस्तित्व जे मानतात त्यांच्याही मार्गात हीच अडचण आहे. त्यांना आम्हीही असा प्रश्न करूं की ही सारी सृष्टि कशी निर्माण झाली ? तिला मूलद्रव्य म्हणून काही तरी असले पाहिजे हे उघड आहे. केवळ शून्यांतून ती निर्माण होणे शक्य नाही. तिच्या मुळाशी शुद्ध अभाव असेल असे मानणे तर्काला सोडून आहे. ती शून्यांतून निर्माण झाली असे मानले तर त्यांतही पूर्वीचाच विरोध आहे असे दिसून