पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

६८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम

नाव देतो. वस्तुतः मूळ क्रियेचे खरे स्वरूप काय ते आपणास केव्हांच समजत नाही. ते समजणे आपणास शक्यच नाही. फक्त प्रतिक्रिया आपल्या जाणिवेत येते आणि आपण तिला विशिष्ट नांव देऊन त्याचा आरोप मूळ क्रिया करणाऱ्या पदार्थावर करीत असतो. मी तुम्हांला पाहतो. तुमचे वास्तविक स्वरूप काय हे मला ठाऊक नाही, आणि ते कळणे शक्यही नाही. तुमचें निश्चित स्वरूप काय ? या प्रश्नाला शास्त्रीय उत्तर म्हटले म्हणजे 'क्ष' हेच. हा अज्ञात आणि अज्ञेय 'क्ष' माझ्या मनावर आदळतो आणि आपल्या बाजूनें मनही प्रतिक्रियेची लाट मूळ क्रिया करणाऱ्या पदार्थाकडे पाठवितें. प्रतिक्रियेची ही लाट मूळ पदार्थापर्यंत जाऊन थडकली म्हणजे ती माझ्या दृष्टिपथांत येते आणि तिला हे अमुक राजश्री, या अमूक बाईसाहेब अशी नांवें मी देतो. 'मी पाहतों' या एका क्रियेंत वस्तुतः दोन क्रियांचा अंतर्भाव झालेला असतो. एक बाहेरून घडलेली क्रिया आणि दुसरी ओतून म्हणजे मनाकडून घडलेली प्रतिक्रिया. बाहेरील पदार्थ 'क्ष+मन' मिळून आपले बाह्यविश्व निर्माण झाले आहे. आपणास प्रत्येक पदार्थाचें ज्ञान अशाच रीतीने झालेले आहे. प्रत्येक प्रकारच्या ज्ञानांत प्रतिक्रिया ही आहेच. किंबहुना, मनाकडून झालेली प्रतिक्रिया हेंच ज्ञान. प्रतिक्रियेच्या अभावी ज्ञान होणेही शक्य नाही. देवमाशाच्या शेपटावर जोराचा तडाखा दिला म्हणजे ही बाह्य संवेदना मनापर्यंत पोहोंचून तेथून दुःखाच्या रूपाने प्रतिक्रिया होते. येथे मूळ क्रिया आणि मनाची प्रतिक्रिया यांत वेळाचें अंतर किती पडतें हेही शोधकांनी निश्चित करून ठेवले आहे. क्रिया आणि प्रतिक क्रिया यांचा हा नियम केवळ बाह्यसृष्टीपुरता मात्र लागू आहे असें नाहीं; तर अंतःसृष्टीलाही हा नियम लागू आहे. माझें अंतःस्वरूप वास्तविक काय आहे हे मला अज्ञात आहे आणि अज्ञेयही आहे. या अंतःस्वरूपाला आपण 'य' म्हणूं. 'मी अमुक' असा निश्चय मी करीत असतो त्या वेळी त्या ज्ञानाचे स्वरूप शास्त्रीय दृष्टया 'य+मन' असें असतें. हा 'य' माझ्या मनावर आदळतो आणि जी प्रतिक्रिया मनाकडून होते तिच्या स्वरूपाचा आरोप या 'य' वर करून 'मी अमुक' असा निश्चय मी करीत असतो. अशा रीतीने सारी बाह्यसृष्टि ही क्ष+मन' असून सारी अंतःसृष्टि 'य+मन' अशी आहे. यांतील 'क्ष' आणि 'य' या वस्तू स्वयंभू स्वरूपाच्या असून क्ष' ही वस्तु बाह्यसृष्टीच्या मागे व 'य' ही अंतःसृष्टीच्या मागे आहे.