पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

जाड्यामुळे बहुतांशी मलिन झालेले असते; तथापि एखाद्याचे चित्त आकर्षण करण्याइतकें सामर्थ्य त्याच्या अंगी असते. एखाद्याचे प्रेम आपल्या मुलांच्या ठिकाणी अतिशय जडलेले असते; अथवा दुसरा कोणी आपल्या स्त्रीवर अत्यंत प्रेम करीत असतो. तथापि त्यांच्यांत प्रेमास योग्य अशी वस्तु कोणती ? ही वस्तु पुरुष हीच आहे. मुलें अथवा स्त्री या बाह्य जड आकारांच्या मागे में पुरुषाचें तेज आहे तेंच चित्त वेधण्यास समर्थ असतें. जड वस्तूशी तें मिसळले गेले असले तरी चित्त वेधण्याची क्रिया करणारे तेंच. पुरुषाशिवाय दुसऱ्या कोणत्याही वस्तूच्या अंगी असें सामर्थ्य नाही. या जड विश्वांत पुरुष हा एकटाच चिदानंदरूप आहे. त्यावांचून दुसरे काहीही चिद्रूप नाही. सांख्यदर्शनकारांनी वर्णिलेला पुरुष या प्रकारचा आहे. जेथें जेथें प्रकाश आहे तेथे तेथें तो पुरुषाचाच आहे. यावरून पुरुष हा सर्वव्यापी असला पाहिजे हे अगदी उघड दिसते. जें सर्वव्यापी नाहीं तें अंतवंत असलेच पाहिजे. तें मर्यादित असले पाहिजे. तें सर्वव्यापी नाही असे म्हणणे म्हणजे ते मर्यादित आहे असे म्हणण्यासारखेच आहे; आणि जें मर्यादित आहे तें कारणापासून उत्पन्न झालेले कार्य असले पाहिजे. कार्य म्हटले की त्याला केव्हांतरी आरंभ झाला असला पाहिजे. आणि आरंभ म्हटला की त्याचा सस्खा भाऊ शेवट तेथे आलाच. जन्म आणि मृत्यु, आरंभ आणि शेवट अशा प्रकारच्या जोड्या नेहमीच अभेद्य असतात. यांपैकी एक जेथे जाईल तेथे दुसरा जावयाचाच. अशाच प्रकारच्या मर्यादित पदार्थांपैकी पुरुष असेल तर तोही कोणत्यातरी कारणाचे कार्य असला पाहिजे; आणि तो कार्यरूप असेल तर त्यालाही आरंभ आणि शेवट हे द्वैत सुटणार नाही. त्याला केव्हातरी आरंभ झाला असेल तर आज ना उद्यां त्याला मृत्यु गांठल्यावांचून राहणार नाही. तो मर्यादित असेल तर तो मुक्तावस्थेत असूं शकणार नाही. त्याचप्रमाणे तो सर्वांचा अंतिम हेतु अथवा आदिकारणही होऊ शकणार नाही. तो मर्यादित असेल तर तोही कशापासून तरी उत्पन्न झाला असला पाहिजे. यांपैकी एकही प्रकार पुरुषाच्या ठिकाणी घडून येत नाहीं; याकरितां तो सर्वव्यापी, अनादि आणि अनंत असाच असला पाहिजे. अशा प्रकारचे पुरुष अनेक आहेत असें श्रीकपिलांचे म्हणणे आहे. असा पुरुष एकच नसून ते असंख्य आहेत असे ते म्हणतात. तुम्हां आम्हांत