पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] सांख्यविचार. ४७

त्त्वाचे आहे. बुद्धि रूपांतर पावून अहंकाराचे रूप धारण करते हे आतां तुम्हांस ठाऊक आहेच. आपल्या शरिरांत शक्तीचें जें जें रूप आपल्या प्रत्ययास येतें तें तें बुद्धीपासूनच निर्माण झाले आहे. हिच्या पोटांत विचाराक्षमता, विचारप्रवणता आणि विचारातीतता या तिन्ही प्रकारांचा अंतर्भाव होतो. जाणिवेचे हे तीन प्रकार आहेत. आतां या तिन्ही प्रकारांचे वर्णन थोडक्यांत करणे अवश्य आहे. एका जाणिवेच्या या तीन अवस्था आहेत. यांपैकी पहिला प्रकार विचाराक्षमता (subconsciousness) हा तिर्यक योनीतील प्राण्यांत आढळून येतो. खालच्या प्रतीच्या प्राण्यांत आणि जनावरांत विचार करण्याची पात्रता नसते. बुद्धीच्या या अवस्थेला ' उपजत बुद्धि ' या संज्ञेने आपण ओळखतो. खालच्या प्रतीच्या प्राण्याचे सारे व्यवहार उपजत बुद्धीच्या आधाराने चालत असतात. उपजत बुद्धि बहुधा कधी चुका करीत नाही. पण तिचे व्यापारक्षेत्र अत्यंत आकुंचित आहे. जनावरांच्या अयुष्यक्रमांत या बुद्धीच्या चुकीमुळे अनर्थ घडले असें फारच क्वचित् आढळून येते. जनावरें रानावनांत भटकतात आणि नानाप्रकारच्या वनस्पती ती पाहातात; पण वाटेल त्या झाडावर ती तोंड टाकावयाची नाहीत. इतक्या प्रकारच्या झाडोऱ्यांतून आपल्या आहाराला योग्य अशी वनस्पति कोणती आणि विषारी अथवा न खाण्याजोगी कोणती हे आपल्या उपजत बुद्धीच्या जोरावर ती बरोबर ओळखतात. या दृष्टीने या उपजत बुद्धीचे कार्य मोठे वाखाणण्याजोगें असतें ही गोष्ट खरी, तथापि तिचे क्षेत्र फारच लहान आहे हेही लक्ष्यात ठेवले पाहिजे. पूर्वी कधीं न पाहिलेला असा पदार्थ त्यांनी पाहिला, अगर पूर्वी अननुभूत अशा अगदी नव्या परिस्थितीत ती सांपडली की त्यांची अवस्था आंधळ्यासारखी होते. तेथे त्यांच्या उपजत बुद्धीचे शहाणपण चालेनासें होतें. यावरून उपजत बुद्धि ही जवळ जवळ एखाद्या यंत्रासारखी आहे असेंही म्हणावयास हरकत नाही. आपले नियत कार्य एखादें यंत्र अगदी बिनचूक पार पाडतें; पण त्या ठरीव मर्यादेच्या बाहेर एक टांचणीही त्याला इकडची तिकडे करवत नाही. त्याचप्रमाणे आपल्या निश्चित क्षेत्रांत उपजत बुद्धि ही बिनधोक वावरते; पण त्यापलीकडे एखादा हातसुद्धा तिला जाववत नाही. यापुढची बुद्धीची पायरी विचारवती बुद्धि ही होय. विचारवती बुद्धि उपजत बुद्धी