पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी. ३५

तितकी चांगली वाटेनाशी होते. यावरून चांगले आणि वाईट या मनाच्या समजुती मात्र आहेत एवढेच सिद्ध होतें. अमुक एक गोष्ट वस्तुतः चांगली नाही अथवा वाईटही नाही. तिला आपण चांगले म्हटलें म्हणजे ती चांगली, आणि ती वाईट अशी आपल्या मनाची समजूत झाली की तीच वस्तु आपणास वाईट दिसू लागते. याकरिता चांगले आणि वाईट या दोन्ही गुणांना वास्तविक अस्तित्व नाही. यांतील फरक आहे तो फरक परिमाणाचा मात्र आहे. जें जें कांहीं आपणास दिसत आहे तें सारें परमात्म्याचेच स्पष्टीकरण आहे. प्रत्येक वस्तूच्या द्वारा तोच स्पष्टदशेस येत आहे. ज्या वेळी हे स्पष्टीकरण अत्यंत जड असते तेव्हां त्याला आपण वाईट म्हणतो आणि ज्या वेळी तें प्रकाशमय असते तेव्हां त्याला आपण चांगले म्हणतो. आत्मरूपावरील सर्व पडदा निखालस गळून पडला म्हणजे त्याचे सर्वात उत्तम रूप प्रकट होते. याकरितां विश्वांत जें जें काही आपणास दिसतें तें सारें आत्मरूपच आहे. या दृष्टीने त्याकडे पाहण्याची संवय आपण लावून घेतली पाहिजे. याच दृष्टीने वस्तुमात्राचे ध्यान आपण सदोदित केले पाहिजे. विश्वांतील वाईट म्हणून जे काही आपणास वाटतें तें सारें नाहींसे होऊन त्या जागी चांगले मात्र शिल्लक राहावेंसें करण्याचा मार्ग हाच आहे. आपली दृष्टि पुरी निवळून सर्व आत्मरूपच आहे असें आपणांस दिसू लागले म्हणजे वाईट असे काही दिसणे शक्यच नाही. कारण आत्मरूप हेच सर्वांत उत्तमोत्तमरूप होय. अशी दृष्टि आपणांस नाही, म्हणून चांगले आणि वाईट अशी द्विधा रूपे आपल्या प्रत्ययास येतात. असें द्वैत शिल्लक आहे तोपर्यंत चांगले आणि वाईट ही शिल्लक असावयाची. या दोन रूपांचा मध्यबिंदु म्हणजे जेथून ही दोन रूपें प्रकट होतात, तें सत्यरूप. तें रूप बरे नाही आणि वाईटही नाही. तर या दोहोंपलीकडे सर्वोत्कृष्ट असें तें रूप आहे. सर्वोत्तम असें रूप एकच असणे शक्य आहे. बरें पुष्कळ असू शकेल आणि वाईटही पुष्कळ असू शकेल; पण उत्तमोत्तम अनेक असूं शकणार नाही. चांगले आणि वाईट यांत निरनिराळ्या परिमाणांचा फरक असू शकेल; पण उत्तमोत्तम म्हटले म्हणजे कशाशीही त्याची तुलना करता येणे शक्य नाही. याकरितां त्याच्या उत्तमत्वाला काही परिमाणही लावता येणार नाही. याकरितां तें एकच असले पाहिजे. हेच उत्तमोत्तम रूप पातळ पड-