पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

असते ही गोष्ट तिच्या लक्ष्यांत आली अथवा न आली तरी वस्तुस्थिति अशीच आहे. केवळ लौकिकाच्या दृष्टीने पाहतां तिचे प्रेम शुद्ध स्वार्थी आहेसें दिसते. तथापि हा दृश्यस्वार्थ त्या परमस्वार्थाचाच अत्यल्प असा अंश आहे. कोणाचे प्रेम कोठेही जडलेले असो, आत्म्याच्या द्वारा आणि आत्म्यावरच प्रेम केल्यावांचून त्याला गत्यंतर नाही. या आत्म्याचे स्वरूप जाणून घेणे हे आपले कर्तव्य आहे. स्वार्थी प्रेम आणि निःस्वार्थी प्रेम यांत फरक काय ? आत्म्याचे वास्तविक रूप न जाणतां त्यावर जे प्रेम करितात त्यांचे प्रेम स्वार्थी होय; कारण त्या प्रेमाचे स्वरूप अत्यंत आकुंचित असते. आत्म्याचे रूप जाणून जे त्यावर प्रेम करतात, त्यांचे प्रेम विश्वव्यापी म्हणजे निःस्वार्थी होय. हेच लोक खरे पंडित होत. त्यांचे प्रेम एखाद्या लहानशा अवकाशांत बांधलेले नसून ते अगदी मुक्तावस्थेत असते. “ आपलें ब्राह्मणत्व आत्म्याच्या ठिकाणी न पाहतां जो तें दुसरीकडे कोठे तरी शोधतो तो आत्मत्यागी होय. आपले क्षत्रियत्व आत्म्याच्या ठिकाणी न पाहतां तें दुसरीकडे कोठें जो शोधतो तो आत्मलाभाला मुकतो. या जगाचा वास आत्म्याच्या ठिकाणी आहे हे ज्याला समजत नाही. त्याचा त्याग जग करतें. सर्व देवदेवतांतरें ही आत्म्याचींच रूपे आहेत हे ज्याला जाणतां येत नाही व देवदेवतांना आत्मरूपाशिवाय दुसरीकडे जो शोधतो त्याचा त्याग देव करतात. हे ब्राम्हण, हे क्षत्रिय, हे जग, ही देवदेवतांतरे आणि याशिवाय विश्वांत जे जे काही आहे तें सारें आत्मरूपच आहे."
 प्रेमाच्या खऱ्या रूपाचे वर्णन याज्ञवल्क्यांनी या प्रकारे केले आहे. प्रेम हे सर्वव्यापी आहे. एखाद्या पदार्थाला आपण विशिष्टत्व देतो तेव्हां त्याचे स्वरूप आपण आकुंचित करीत असतो. त्याचें सामान्य विश्वव्यापी रूप नाहीसे करून त्याला काही विशिष्ट मर्यादेंत आपण आणून ठेवतो. आत्मरूपाहून तो वेगळा आहे असे आपण मानीत असतो. त्याला आत्मरूपापासून आपण विभक्त करतो. एखाद्या स्त्रीवर मी प्रेम करतो. त्या प्रेमाचा विषय विशिष्टरूपाचा झाला की तो मर्यादित झाला. तिच्या देहाच्या हद्दीतच माझं हे प्रेम आकुंचित होऊन राहते. असे झाल्याबरोबर आत्म्याचे रूपही माझ्या दृष्टीने आकुंचित होऊन तेवढया क्षुद्र देहांत येऊन बसते. अशा स्थितीत माझें तिजवरील प्रेम अमर्याद होऊ शकणार नाही. तिच्या क्षुद्र