पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

[ नवम स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.२८

खरा दुर्दिन नव्हे. याज्ञवल्क्य या नांवाचे एक महर्षि होते. वृद्धापकाळ प्राप्त झाला म्हणजे संसाराचा त्याग करावा अशी हिंदुशास्त्रांची आज्ञा आहे हे तुम्हांस ठाऊक असेलच. शास्त्रकारांच्या या आज्ञेस अनुसरून महर्षि याज्ञवल्क्य आपल्या पत्नीला म्हणाले, " हे सर्व धन आणि बाकीची सारी मालमत्ता यांचा त्याग करून अरण्यवास करावयास मी जातो. यावर त्यांची पत्नी मैत्रेयी म्हणाली, "महाराज, हे सारें वित्त आपण मला दिले हे खरे; पण या जगांतली सारी संपत्ति एकत्र केली तरी ती मला अमृतत्व देऊ शकेल काय ?" याज्ञवल्क्यांनी उत्तर दिले, " छे! छे ! अशी गोष्ट कालत्रयींही घडावयाची नाही. तूं संपत्तिमान होशील आणि धनधान्यांची समृद्धि तुझ्या घरी होईल. हे सारे कांहीं होईल; पण संपत्ति तुला अमृतत्व देऊ शकेल ही गोष्ट कधीच घडावयाची नाही." पतीचे हे भाषण ऐकून मैत्रेयी म्हणाली, “ तर मग ज्याच्यायोगाने अमृतत्वाची प्राप्ति मला होईल अशी वस्तु प्राप्त करून घेण्यास मी काय करावें ? महाराज, असा काही मार्ग आपणास अवगत असेल तर कृपा करून तो मला सांगावा." याज्ञवल्क्य म्हणाले, " मैत्रेयी, तूं मला नेहमीच प्रिय होतीस; पण आता तर तूं मला अधिकच आवडू लागली आहेस. तुझ्या या प्रश्नामुळे तुजवर माझे प्रेम अधिकच जडलें आहे. इकडे येऊन बैस, म्हणजे सर्व काही मी तुला सांगतो. तें सारें तूं प्रथम लक्ष्यपूर्वक ऐकून घे, नंतर त्यावर पूर्ण विचार कर, आणि त्याचाच ध्यास चित्तांत धर."
 " मैत्रेयी, पतीवर पत्नी प्रेम करते, ते त्याच्या देहासाठी नव्हे, तर ती आत्म्यावर प्रीति करिते. म्हणजे ती स्वतःवरच प्रीति करीत असते. त्याचप्रमाणे कोणीही पुरुष आपल्या पत्नीवर प्रेम करतो तें त्या पत्नीसाठी नसून त्याचे प्रेम स्वतःवरच असते. कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतात ते त्या मुलांसाठी नसून ते स्वतःवरच प्रेम करीत असतात. केवळ संपत्तीसाठी संपत्तीवर प्रेम कोणीही करीत नाही; पण प्रत्येकाचे प्रेम स्वतःवर असते म्हणून तो संपत्तीवर प्रेम करतो. कोणाची भक्ति ब्राह्मणांच्या ठिकाणी असते. ती भक्तिही वस्तुतः त्या ब्राह्मणांकरितां नसून स्वतःवर त्यांची भक्ति असते आणि त्या ब्राह्मणांच्या रूपाने स्वतःचीच भक्ति ते करीत असतात. या जगावर कोणी प्रेम करतात, पण ते प्रेम जगासाठी नसून स्वतःसाठींच