पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] कैवल्याचा मार्ग. २५

आहे, मी अनंत तेजांतील एक स्फुल्लिंग आहे' असे म्हणणे मोठे काव्यमय असेल आणि त्यायोगे तुमच्या चित्ताला संतोषही होत असेल; पण विवेचक बुद्धीला हे म्हणणे पटावयाचे नाही. अनंतत्वाचे भाग पाडणे या म्हणण्याला कांही अर्थच नाही. जडवस्तूचेच भाग पाडता येतील. अनंतत्व हे जड आहे काय ? याकरिता अनंताचे भाग पाडणे शक्य नाहीं; आणि अनंताचे जर भाग पाडता आले तर मग त्याचे अनंतत्व कोठे राहिले ?
 या एकंदर विवेचनावरून निष्कर्ष काय निघतो याचा विचार आतां केलापाहिजे. निष्कर्ष हाच की तुम्ही विश्वव्यापी परामात्म्याचे अंश नसून परमात्मरूपच आहां; तुम्ही लहानसे भाग नसून पूर्ण विश्वात्माच आहां; परमेश्वराचे अंश तुम्ही नसून सर्व परमेश्वर तुम्ही आहा.
 आतां यावर कोणी असा प्रश्न करील की आम्ही जर सर्व एकरूप आहों,तर सृष्टीत इतकी विविधता आली कोठून ? कोट्यानकोटी जीवात्मे आज अस्तित्वांत आहेत हे तर आम्ही आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहत आहों. मग हे इतके वेगवेगळे जीवात्मे कोठून आले ? यांचे स्वरूप काय ? पाण्याच्या एक कोटी बिंदूंवर जर सूर्याचे प्रतिबिंब पडले तर त्यांपकी प्रत्येक बिंदूंत एक एक संपूर्ण सूर्य दिसतो. सूर्याचे संपूर्ण प्रतिबिंब त्यांपैकी प्रत्येकांत असते; पण ते सारे खरे सूर्य आहेत असे कोणी म्हणेल काय ? ती नुसती प्रतिबिंबेंच होत आणि खरा सूर्य एकच असतो. त्याचप्रमाणे हा दृश्य जीवात्मा परमात्म्याचे प्रतिबिंब मात्र आहे. यापलीकडे त्याला दुसरें अधिक रूप नाही. आपणांमध्ये असलेल्या या दृश्य जीवात्म्यामागें जो खरा परमात्मा आहे तो एकच आहे. या दृष्टीने विचार करतां आपण सारे एकरूपच आहों असें म्हणावयास नको काय? साऱ्या विश्वाच्या मागें परमात्मा एक असून त्याची प्रतिबिंबें मात्र अनेक आहेत. तो ज्याप्रमाणे तुमच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे माझ्यामध्येही आहे आणि असे असतांही तो एकच आहे, व अनेक शरिरांत प्रतिबिंबरूपाने अनेक जीवात्म्यांची रूपें तो धारण करतांना दिसतो. आपल्या अज्ञानामुळे या गोष्टीचा उमज आपणास पडत नाहीं; आपण परस्परांपासून भिन्न आहों असें आपणांस वाटतें, आणि यामुळेच तो परमात्माही आपणांपासून वेगळा आहे असा भ्रम आपणांस पडतो. हा भ्रम आपणापाशीं शिल्लक आहे तोपर्यंत जगांत ही सारी दुःखें शिल्लक राहा-