पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२९४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


मनाशी असला लपंडाव करणे, हा शुद्ध अप्रामाणिकपणा आहे. असे करण्यांत आपल्या अंतःकरणाच्या रत्नभांडारांत शिरून तुम्ही चोरी करितां, असें आ पले महानुभाव पूर्वज आपणांस सांगतात.
 या प्राचीन पंथापासून मला कोणत्या ज्ञानाची प्राप्ती झाली ? मी शिकलों तें हैं. 'दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रहहेतुकं । मनुष्यत्वं[ नवम मुमुक्षत्वं महापुरुषसं श्रयः ॥' मनुष्यजन्म, मुमुक्षा आणि सद्गुरूचा आश्रय या तीन वस्तु मिळण्यास अत्यंत दुर्लभ असून, त्या फक्त परमेश्वराच्या प्रसादाच्या द्वारेंच मिळतील. पहिली दुर्लभ गोष्ट मनुष्याचा जन्म प्राप्त होणे, ही होय. कारण, मुक्तिलाभ मनुष्यदेहाशिवाय दुसऱ्या कोणत्याहि देहाच्या आश्रयाने होणे शक्य नाही. यानंतर दुसरी दुर्लभ वस्तु मुमुक्षत्वही आहे. अगोदर मुक्तीची इच्छा पाहिजे, ती असल्याशिवाय तिच्या साधनांचा विचारच कोणी करणार नाही. व्यक्तिपरत्वें मुक्तीचे मार्ग भिन्नभिन्न असू शकतील. नानापंथ आपलाच मार्ग श्रेष्ठ, असेंहि कदाचित् म्हणतील. अशा रीतीने येथे मतांतर दिसले, तरी मुमुक्षा प्रथम असल्याशिवाय मुक्ति मिळणार नाही, हे म्हणणे कोणीहि नाक बूल करणार नाही. मुक्तीची अत्युत्कट इच्छा म्हणजे मुमुक्षा. लौकिक संसा राबद्दल ज्याच्या चित्ताला पूर्णविषाद उत्पन्न झाला असेल आणि सुखदुःखादि द्वंद्वांच्या बाहेर जाण्याची इच्छा ज्याच्या चित्तांत अत्यंत तीव्र झाली असेल, तो मुमुक्षु. इतकी उत्कट इच्छा जेव्हां तुमच्या चित्तांत उत्पन्न होईल आणि ऐहिक जगाचे वारेंहि तुम्हांस असह्य होऊ लागेल, तेव्हां आत्मलाभाच्या मार्गाला लागण्यास तुम्हांस अधिकार प्राप्त होईल.
 यानंतर महापुरुषाचा आश्रय ही तिसरी महत्त्वाची बाब आहे. ज्याने स्वतः परमात्मलाभ मिळविला आहे, अशा सद्गुरूची संगति घडल्याशिवाय मुक्तिलाभासाठी काय करणे अवश्य आहे, हेहि आपणांस समजावयाचें नाहीं. जगाबद्दल आपल्या चित्तांत कितीहि तिटकारा उत्पन्न झाला आणि मुक्ति लाभाची इच्छा कितीहि तीव्र झाली, तरी सत्संगाशिवाय ती इच्छा फलद्रूप व्हावयाची नाही. हे होण्यास गुरुकृपेचीच आवश्यकता आहे. अशी आव श्यकता का असावी ? ती असण्याचे कारण हेच की, अत्यंत प्राचीन काळा पासून महाशक्तीशी संयोग करून देण्याचे कार्य गुरुपरंपरेच्या द्वारेंच आज पर्यंत घडून आले आहे. आणि या मूलशक्तीची भेट तुम्हांस घ्यावयाची