पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी काय शिकलों.

******

 पूर्व बंगाल्यांत येण्याची जी संधि मला मिळाली, तीबद्दल मला होत अ सलेला आनंद प्रथम व्यक्त केला पाहिजे. पाश्चात्य देशांतील अनेक ठिकाणी मी भटकलों आणि तेथील संस्कृतीहि मी पाहिली; पण घरा शेजारील या भागांत येण्याची संधि पूर्वी मला मिळाली नाही. आतां येथे प्रत्यक्ष फिरून कांहीं नवा ज्ञानलाभ मला करून घेता येईल, याबद्दल मला आनंद वाटतो. पूर्व बंगाल्यांतील विशाल नद्या, विस्तीर्ण आणि सुपीक प्रदेश आणि चित्रासारखी लहान लहान खेडी, ही पाहून माझे नेत्र तृप्त होतील. वास्तविक पाहिले तर बंगाल ही माझी जन्मभूमि; पण असे असतांहि या प्रदेशांतील सृष्टिसौंदर्य उपभोगण्याचे सुदैव यापूर्वी मला प्राप्त झाले नाही. माझ्या या मातृभूमीत इतके सौंदर्य आणि मनोहारित्व असेल, अशी कल्पना यापूर्वी मला झाली नाही. येथील भूपृष्ठ पहा अथवा जलपृष्ठ पहा; दोन्ही ठिकाणी सृष्टिदेवी सारखीच रमणीय असल्याचे दृष्टोत्पत्तीस येईल. जगांतील अनेक देश हिंडून आल्यानंतर माझ्या मातृभूमीची यात्रा मला घडली, हेहि एकपरी बरेंच झालें, असे मला वाटते. कारण, त्यामुळे येथील सृष्टिसौंदर्यांची माधुरी मला अधिक रसिकतेनें चाखता येईल. इतर देशांतील सृष्टिसौंदर्याची तुलना येथल्या सौंदर्याशी मला आतां करितां यईल. आणि यामुळे माझा आनंदहि द्विगुणित होईल.अशा रीतीनें भटकत फिरत असतां, नाना धर्माची आणि पंथांची माहिती मला झाली. यांत कांहीं अर्वाचीन पंथ पाश्चात्यानुगामीही आहेत. पाश्चात्यांचे ध्येय त्यांनी आपलेसे केले आहे. मी दारोदार हिंडत असतां दुसरेहि कित्येक पंथ माझ्या पाहाण्यांत आले. पण त्यावेळी आमच्या राष्ट्रीय धर्मात आणि येथील सृष्टीत इतकें सौंदर्य भरले असेल, अशी कल्पनाहि माझ्या चित्तांत शिरली नाही. साऱ्या जगांत मनुष्यजातीची पारलौकिक आकांक्षा तृप्त करणारा जर कोणता धर्म असेल, तर तो फक्त हिंदुधर्मच आहे. अशी माझ्या चित्ताची खात्री आज पुष्कळ वर्षांपासून झाली आहे. आणि यामुळेच या अद्वितीय धर्माचे अनुयायी स्वधर्माबद्दल इतके उदासीन आहेत, हे पाहून माझ्या अंत: करणांत वारंवार खेद उत्पन्न होतो. ही उदासीनता देशाच्या एखाद्या भागा पुरतीच नसून हा प्रकार मला सर्वत्र आढळून आला. आतां सांप्रतची परि.