पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२९० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


चालविण्यास समर्थ असें मन आणि त्याबरोबरच अत्यंत नम्रता, विनय आणि आज्ञाधारकता हीहि अवश्य असली पाहिजेत. तुमच्या मठपतीने नदीत उडी टाकण्याची आणि सुसर धरून आणण्याची आज्ञा तुम्हांस दिली, तर तिची अंमलबजावणी प्रथम करून तिच्या युक्तायुक्ततेची चर्चा तुह्मी पाठीमागून करा. आज्ञा अयुक्त असली, तरी तिचे पालन प्रथम आणि बुद्धिवादाचा विरोध नंतर, असा क्रम तुह्मीं स्वीकारला पाहिजे. आमच्या देशांत आणि विशेषतः बंगाल्यांत प्रत्येक मतवाला आपला निराळाच पंथ स्थापू पहातो. आपली मतें आणखी कोणाशी मिळत आहेत की नाही, हे पाहाण्यासाठी तो क्षणभ रहि थांबावयाचा नाही. यामुळे व्यक्ति तितके पंथ असा प्रकार होऊन पुरु 'षार्थी माणसांची निपज होणे अशक्य झाले आहे. याकरितां आपल्या संघाचा अमिमान तुह्मांला असला पाहिजे. संघाची आज्ञा म्हणजें परमेश्वराचा हुकूम, अशी तुमच्या चित्ताची मान्यता असावी. कसलाहि हुकूम तुम्ही केव्हांहि सोडूं नये. असल्या उद्दाम वृत्तीचे बीज जागच्या जागींच करपवून टाकलें पाहिजे. असा एखादा मनुष्य तुमच्यांत आढळल्यास त्याला ताबडतोब हद्दपार करा. आपल्या छावणीत असले हेर केव्हांहि राहूं देऊ नका. ही हवा जितकी स्वतंत्र तितकीच तुमची वृत्ति स्वतंत्र असतां या झाडासारखी अथवा

त्या कुत्र्यासारखी ती आज्ञाधारकहि असावी.


**********