पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


फेड केल्यावांचूनहि चालत नाही. आपल्या शक्तीप्रमाणे या नियमाची अम्म लबजावणी आपण नेहमी करीत राहिले पाहिजे. या लोकांत रहात असतां येथे सुखी कसे व्हावें, ही कला पाश्चात्यांपासून आपणांस शिकावयाची असेल तर चिरंतन सुखाची प्राप्ति ज्या मार्गाने होते, तो मार्ग पाश्चात्यांस आपण अवश्य दाखवावा. कोणतेंहि कार्य करितांना केवळ आपल्यापुरताच विचार करूं नये. साऱ्या मानवजातीच्या सुखाकरितां झटणे हेच आपले कर्तव्य आहे. केवळ आपल्यापुरतेंच पाहाण्याचे आपले जुने आकुंचित मार्ग आपण आतां टाकून दिले पाहिजेत. आपणा प्रत्येकाच्या मागे मृत्यु सदोदित उभा आहे, हे जाणून असल्या क्षुदपणाचा त्याग आपण करावा. अध्यात्मज्ञाना साठी साऱ्या जगाने भरतभूमीच्या पायाशीच धाव घेतली पाहिजे, हे ऐति हासिक सत्य कधींहि विसरू नका. परमेश्वराच्या सृष्टिरचनेत भरतभूमीचें स्थान अशा प्रकारचे असल्यामुळे तिला कधीहि मरण प्राप्त होणार नाही. चिरंतन सत्य जेथें सांठविले आहे, तेथे मरण कोठचें ? चीन देश मरणार नाहीं अथवा जपानहि मरणार नाही. आपल्या जीविताचा आधार काय, या गोष्टीचे स्मरण आपण नित्य बाळगिले पाहिजे.
 याकरितां धर्मज्ञान हाच आपला मुख्य जीवनहेतु आहे, ही गोष्ट आपण ध्यानांत ठेविली पाहिजे आणि हे साधण्याकरितां आपणाला कोणी तरी मार्गदर्शक पाहिजे. आपला धर्म म्हणजे शुद्ध अध्यात्म ज्ञान नव्हे, असें ज्या हिंदूला वाटतें तो खरोखर हिंदूच नव्हे. असें न वाटणारे एखादें लहान पोरहि आपणांस असेल असे मला वाटत नाही. काश्मिरांत असतां एके वेळी एका मुसलमान स्त्रीला मी म्हटले, बाई, तुमचा धर्म कोणता ? तेव्हां तिने आपल्या भाषेत मला उत्तर दिले, ईश्वराच्या दयेबद्दल त्याचे मोठे उपकार मी मानते, मी ख-या मुसलमानी धर्माची आहे ही त्याचीच कृपा. पुढे एका हिंदु मुलाला असाच प्रश्न मी केला, तेव्हां मी हिंदु आहे इतकाच साधा जबाब त्याने मला दिला. कठोपनिषदांत असलेला अत्यंत महत्त्वाचा असा एकच शब्द मला नेहमी स्मरतो. हा शब्द श्रद्धा असा आहे. नाचिकेताची गोष्ट तुम्ही वाचली तर श्रद्धा या शब्दाचा खरा अर्थ काय आहे, हे तुम्हांस कळेल. आत्मश्रद्ध व्हा, एवढा एकच उपदेश करणे, हे माझें जीवितकार्य

आहे. सर्व धर्मात हाच एक मुख्य मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे.