पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड] हिंदुतत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम. २८३


कोणत्या तरी स्वरूपाचे स्वतंत्र सामर्थ्य आहे, या मुद्याकडे हिंदुस्थानाशि वाय बाकीच्या साऱ्या जगाने कानाडोळा केला आहे. जीवात्मा अशक्त आणि जवळ जवळ क्रियाहीन आहे, असाच बाकीच्या जगाचा समज आहे. उलट पक्षी तो अनंतरूप आणि सदापूर्ण आहे व तो असाच नेहमी राहणार असें आमचे तत्त्वज्ञान आम्हांस सांगते. आमच्या उपनिषदांनी शिकविलेला हा घडा आपण नेहमी लक्षांत बाळगिला पाहिजे.
 आपल्या जन्माचा हेतु काय आहे याचे नित्य स्मरण करीत जावें. आम्हा हिंदु लोकांच्या डोक्यांत आणि विशेषतः बंगाल्यांच्या डोक्यांत विदेशीय कल्पनांचा सुळसुळाट झाला आहे आणि या कल्पना राष्ट्रधर्म पोखरून टाकीत आहेत. अलीकडे आपण इतके कशाने मागसलो आहोत? आमच्यापैकी शेकडा नव्याण्णव लोकांच्या डोक्यात विदेशी कल्पना तुडुंब भरून राहिल्या आहेत. असे का झाले ? राष्ट्रमालिकेत आपणांस कांहीं उच्चस्थान प्राप्त करून घ्यावयाचे असेल, तर या परदेशी कल्पनांचा त्याग आपण प्रथम केला पाहिजे. त्याचप्रमाणे पाश्चात्यांपासून आपणांस शिकण्यासारख्या अशा पुष्कळ गोष्टी आहेत, हेहि ध्यानात ठेवले पाहिजे. पाश्चात्यांची आदिभौतिक शास्त्रे आणि त्यांच्या कला, ही आपण आपलीशी केली पाहिजेत. या गोष्टी शिकण्यासाठी आपण जसे पाश्चात्यांकडे जातो, त्याचप्रमाणे धर्म आणि तत्त्वज्ञान शिकण्या करितां ते आपणांकडे आले आहेत. या गोष्टीत आम्ही हिंदु लोक सा-या जगाचे गुरु आहों हे कधीहि विसरू नका. राजकीय हक्क आणि अशाच जातीच्या दुसऱ्या वस्तू मिळविण्याकरितां आपण मोठी ओरड चालविली आहे. ठीक आहे. पण असे हक्क मैत्रींतून उत्पन्न होत असतात; आणि खरा मित्रभाव अगदी बरोबरीच्या दोन माणसांत मात्र उत्पन्न होऊ शकतो. या दोन माणसांपकी एक भिकारी असेल तर त्याची व त्याच्या दात्याची मैत्री कधी काळी तरी जमेल काय ? हे सारे बोलणे सोपे आहे, पण त्याप्रमाणे कृति घडणे मात्र फार कठीण आहे. परस्परसाहाय्यावांचून आपणांस जरूर असलेली शक्ति कधीहि उत्पन्न व्हावयाची नाही. याकरितां इंग्लंडांत अथवा अमेरिकेंत जातांना भिक्षेकरी या नात्याने नव्हे, तर धर्मगुरु या नात्याने तुम्ही जावे अशी माझी इच्छा आहे. देवाण घेवाण हा साऱ्या जगाचा कायदा आहे. दिल्यावांचून काही मिळत नाही आणि मिळाले असेल त्याची परत