पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ] हिंदुतत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम.२८१


स्वरूप देण्याची इच्छा आमच्या ठिकाणी वाढत आहे. त्याचप्रमाणे या अँग्लो सक्सनवंशाने साऱ्या जगाचे दळणवळणाचे मार्ग आम्हांस खुले करून दिल्या मुळे आजपर्यंत लपवून ठेवलेला आमचा विचारनिधि जगापुढे आणण्याची इच्छा आम्हांस होऊ लागली आहे. या अँग्लो सक्सनवंशाने हिंदुस्थानाच्या भवितव्यतेचा मार्ग मोकळा केला आहे. पूर्वी कधीहि नव्हता एवढया विस्तृत प्रमाणावर आमच्या प्राचीन तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याची संधि सध्या आपणांस मिळाली आहे. आपल्या प्राचीन पूर्वजांनी सत्याचा आणि मुक्तीचा मार्ग जगाला उघडा करून दाखविला, तेव्हा हे कार्य त्यांनी कोणत्या परि स्थितीत केले ? सर्वत्र बंधुभावाचा उपदेश बुद्धाने जगाला केला तेव्हाही परि स्थिति कशा प्रकारची होती? त्या वेळी हि या मार्गात पुष्कळ सवड होती. त्या वेळींहि जगाच्या एका टोकापासून दुसन्या टोकापर्यंत आपल्या तत्त्वांचा प्रसार करणे सुलभ होते. आता येथे अँग्लो साक्सनवंशाचे राज्य झाले आहे, आणि अशा रीतीने जेथे आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार पूर्वी झाला नव्हता, तेथें तो आतां होऊ लागला आहे, एवढेच नव्हे तर त्याचे ग्रहणहि तेथे उत्सुकतेने होत आहे. आमच्या या तत्त्वप्रसाराच्या कार्यांत खुद्द इंग्लंडांतील अनेक बुद्धिमान् पंडित आम्हांस मदत करीत आहेत. मूल्लरबाईचे नांव आतां पुष्कळांच्या कानीं असेलच. आज त्या स्वतःच येथे हजर आहेत. यांचा जन्म एका चांगल्या आणि सुशिक्षित कुटुंबांत झाला आहे; आणि हिंदुस्था नाच्या प्रेमाने प्रेरित होऊन आपले उर्वरित आयुष्य या देशाच्या सेवेत घाल वावें, अशा हेतूने त्या येथे आल्या आहेत. यापुढे आपला मातृदेश म्हणजे हिंदुस्थान आणि हिंदी लोक हेच आपले कुटुंब, असें मानून त्या येथे काय मची वस्ती करणार आहेत. मिसेस् बेझंट यांचे नांव ऐकले नाही असा मनुष्य आपणांत बहुधा कोणी नसेल. या इंग्रज श्रीने आपले सारे आयुष्य उदारपणे हिंदुस्थानाच्या सेवेला वाहिले आहे. त्याचप्रमाणे आपल्या आजच्या सभेत आणखी दोन अमेरिकन स्त्रिया हजर आहेत. त्यांचाहि उद्देश या देशाची सेवा करण्याचा आहे. आपल्या या गरीब देशाला थोडी तरी मदत करावी एवढीच त्यांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे आपल्या एका देशबांध वाचे स्मरण तुम्हांस करून देणे माझे कर्तव्य आहे. या गृहस्थाचें नांव मोहिनीमोहन चतरजी असे आहे. पाश्चात्य देशांत यांनी पुष्कळ प्रवास केला