पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त. २७७


सर्वत्र अंधार पसरला असला तर भांडणे करून आणि एकमेकांस शिव्या देऊन तो नाहीसा होणार नाही. एखाद्या अंधाऱ्या जागेत जाऊन अंधार अंधार म्हणून नुसता कंठशोष आपण कितीहि केला तरी तेवढयानें तो ना हीसा होणार आहे काय ? अशी आरडाओरड करण्याऐवजी निमूटपणे तेथे एखादी काडी तुम्ही ओढली, की ती जागा ताबडतोब प्रकाशित होईल. माण सांना सुधारण्याचा खरा मार्ग हाच आहे. लोकांपुढे उच्चतर ध्येये मांडून त्यांची आकांक्षा जागृत करा. प्रत्येकाला आत्मविश्वास हा प्रथम पाहिजे. स्वतःच्या कर्तवगारीवर त्याचा भरवसा पाहिजे. मनुष्य हा स्वस्थाननष्ट आणि पतित प्राणी आहे, असें आधीच गृहीत धरून कां चालावें. एखादा मनुष्य कितीहि बाईट असला तरी त्याच्यात काही तरी कर्तबगारी असते हा माझा विश्वास केव्हाही ढळला नाही; आणि अशा प्रकारची कर्तबगारी प्रत्येकाच्या ठिकाणी मला आढळूनहि आलेली आहे. आरंभी कित्येक वेळा एखाद्या मनुष्यांत कर्तृत्वशक्तीचा अभाव आढळून आला, तथापि अखेरीस त्याच्या पौरुषाचा विजय होतो असेंच मला आढळून आले. कोणी विद्वान् असो अगर अगदी मूढ असो, त्याच्यात काही तरी कर्तबगारी आहे हे नित्य ध्यानात ठेवा. कोणी देवाप्रमाणे सात्विक दिसत असला अथवा दुसरा एखादा राक्षसाप्रमाणे तमोगुणी दिसत असला, तरी त्या दोघांतहि पौरुष आहे हे लक्षात आणा. अशा प्रकारचा विश्वास आधी पाहिजे. मग एखाद्याच्या ठिकाणी काही उणीवा दिसत असल्या, अथवा त्याच्या हातून चुका घडत असल्या, तथापि त्या स्वभावजन्य नाहीत. त्याच्यापुढे अधिक उच्च ध्येय नाही म्हणूनच भलभ लत्या मतांना आणि हटवादाला चिकटून बसून तो चुका करीत असतो हा मुद्दा केव्हाही विसरू नये. असत्याकडे मनुष्याचे मन धांव घेते याचे कारण हेच की, सत्य वस्तूची कल्पना त्याच्या चित्ताला नसते. याकरितां खोट्या मार्गापासून त्याला परावृत्त करण्याचा उपाय खरा मार्ग त्याला दाखविणे हाच होय. हा मार्ग तुम्ही त्याला दाखवून दिला म्हणजे तुमचे काम संपले. मग त्या दोन मार्गाचा बरेपणा अथवा वाईटपणा त्याचा तोच पाहील. सत्य मार्ग एकवार त्याला दाखवून देणे इतकेंच तुमचे काम आहे. आपल्या पूर्वीच्या मार्गात कमीपणा कोठे होता आणि नव्या मार्गात चांगलेपणा कोठे आहे, हे शोधून काढण्यास त्याला तुम्ही मोकळा सोडून द्या. तुम्ही दाखविलेला मार्ग