पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२७६ स्वामीविवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


शब्दांच्या मार्गाने मात्र आपण जात असतो. त्यांतील खरा जीवभाव सोडून देऊन बाकी उरलेल्या कलेवराला मात्र आपण मिठी मारली आहे.
 ही व अशाच प्रकारची दुसरी अनेक कोडी लक्षात घेण्यासारखी आहेत. यांतील रहस्य जाणून ते प्रत्यक्ष आचारांत कसे आणावें आणि या कोड्यांचा उलगडा कसा करावा, यासंबंधी माझे विचार तुम्हांस सांगण्याची माझी मोठी इच्छा होती. पण टुर्दैवाने वेळाच्या अभावी आज मला तसे करितां येत नाही; याकरितां, अशाच प्रकारच्या पुढे दुसऱ्या एखाद्या संधीची वाट पाहून आज हा विषय येथेच सोडणे मला प्राप्त आहे.
 जातां जातां आणखी एकाच विषयासंबंधानें चार शब्द सांगून मी आपली रजा घेतो. आज दीर्घकाळ धर्मज्ञानाला आपल्या या भूमीत संचालन मिळाले नसल्यामुळे तें स्तब्धतेच्या स्थितीला आलेले आहे. तुमच्या ठिकाणी कर्मप्रव णता उत्पन्न करण्याचे सामर्थ्य त्याला राहिलेले नाही. तें सामर्थ्य त्याला पुनः प्राप्त करून देणे हे आपले कर्तव्य आहे. आपणांपैकी प्रत्येकाच्या रोजच्या व्यवहा रांत धर्मज्ञान मूर्तिमंत दिसेल असे करण्याचा यत्न आपण केला पाहिजे. धर्माचा संचार पूर्वी जसा राजवाड्यापासून झोपडीपर्यंत होता, त्याचप्रमाणे तीच स्थिति आतांहि आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. अत्यंत दरिद्री शेतक-यालाहि धर्मज्ञानाची वाण पडूं देतां उपयोगी नाही. धर्मज्ञान हा सा-या हिंदु कुलाचा वारसदारीचा हक्क आहे. या कुलाचे वंशज या वारशांत सारखेच भागीदार आहेत; आणि त्यांच्या हक्काची ही बाब त्यांच्या घराच्या दारापर्यंत पोचवि विण्याचे कार्य आपण केले पाहिजे. वस्तुतः हक्काने मिळणा-या या वस्तूला आज ते पारखे झाले आहेत; पण ही स्थिति आपण बदलली पाहिजे. परमे श्वरनिर्मित हे वातावरण जितक्या मोकळेपणे वावरते आणि ते जसे सर्वांच्या उपभोगास सारखेंच पात्र होते, तसें धर्मज्ञानहि आपण सर्वांस उपलब्ध करून दिले पाहिजे. आज आपणांस येथें कांहीं कार्य म्हणून असेल तर ते हेच आहे; पण नवे नवे पंथ काढून आणि आपसांत मारामाऱ्या करून मात्र हे कार्य होणार नाही. क्षुल्लक मतभेदांचा वारंवार उच्चार केल्याने आणि त्यां वरच जोर दिल्याने मतैक्य होत नाही. मतभेदाच्या बाबी बाजूला सोडून जेथें मतैक्य आहे, तेवढयांचा प्रचार तरी आपण जारीने करूं या. क्षुल्लक मतभेद बाजूला सोडल्याने कालांतराने ते आपोआपच मरून जातील. आज