पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२७२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ,[ नवम


शुद्ध हाडामांसाचा गोळा यापेक्षा अधिक उच्च प्रतीची भावना त्यांच्या ठिकाणी नव्हती. मनुष्य मेला म्हणजे पाश्चात्य भाषेत 'त्याने आपला आत्मा सोडला अस म्हणतात. उलट पक्षी 'त्याने देह सोडला' असे आम्ही म्हणतो. पाश्चा त्यांच्या दृष्टीने देह आधी आणि मग साऱ्या गोष्टी. मनुष्याला आत्मा आहे की नाही, याचा विचार ते मागून करतील. याच्याच अगदी उलट आमचे मत आहे. आत्मा आधी असून मग तो देह धारण करतो. या पहिल्या मतां तरामुळे पुढच्या सा-या इमारतींत जमीनअस्मानाचा फरक उत्पन्न झाला आहे. पाश्चात्यांच्या संस्कृतीची उभारणी या वाळूच्या पायावर झाली असल्यामुळे आणि तींत सारे प्राधान्य देहसौख्याला असल्यामुळे, ती प्राचीन राष्ट्रे एका मागून एक विलयास गेली. उल्कापाताप्रमाणे क्षणभर चमकावे आणि पुढ च्याच क्षणी त्याचा मागमूसहि राहूं नये अशी त्यांची गत झाली. जगांत ती होती की नाही हीसुद्धा जणूं काय शंकेची गोष्ट होऊन बसली. उलट पक्षी हिंदुस्थानची संस्कृति अनेक उत्पातांतून आजपर्यंत टिकली आहे. हिंदुस्थाना चीच काय, पण त्याचे पादवंदन करून ज्यांनी त्याचा उपदेश घेतला ती चीन आणि जपान ही राष्ट्रही आज जिवंत आहेत, एवढेच नव्हे तर ती आज उदयोन्मुखही झाली आहेत. त्यांच्या पुनरुज्जीवनाची चिन्हें आजही स्पष्ट दिसत आहेत. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुनःपुन्हां मृत्युवश झाली तरी ती पुनः पुन्हां जिवंत होऊन उठतात; आणि पहिल्यापेक्षाही अधिक तेजाने तळपूं लागतात; पण ज्या राष्ट्राची संस्कृति शुद्ध जडवादाच्या पायावर झाली आहे, त्यांनी एक वेळ राम म्हटला की कायमचीच नाहीशी होतात. याकरितां आजची अवनता पाहून धीर सोडूं नका. तुम्हांला घाबरे होण्याचे काही कारण नाही. सारा भविष्यत्काल आपलाच आहे हे निश्चित समजा; घाबरून जाऊन भल भलते उपाय योजू नका. उगीच कोणाचे तरी अनुकरण करीत सुटण्यांत फायदा नाही. आपणांस जो मुख्य धडा शिकावयाचा तो हाच की, अनु करण म्हणजे संस्कृति नव्हे. एखाद्या बादशहाच्या पोषाखाने उद्या मी आप णांस सजविलें म्हणजे मी खरोखरच बादशाह झालों काय ? सिंहाचे कातडें पांघरलेला गाढव सिंह होत नाही. केवळ भीतीने दुसऱ्याचे अनुकरण करून तुमचे पाऊल पुढे पडेल, ही गोष्ट मनांतसुद्धां आणू नका. दुसऱ्याचें अनु करण करण्याची बुद्धि हेच खऱ्या अधःपाताचे लक्षण आहे. हा अधःपात