पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ] हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.२६७


तेच माझ्या या बिंदुरूपाच्याहि मागे आहे. प्रियवंधूंनो ! या महा मंत्राचे पठन अहोरात्र तुम्ही करा. याच्या जपाशिवाय एक क्षणहि जाऊ देऊ नका; आणि तुमची मुलेबाळे जन्माला आली म्हणजे तेव्हापासूनच या महामंत्राचा उपदेश त्यांना तुम्ही करा. त्यांना अद्वैत-दैत अथवा हा पंथ आणि तो पंथ असल्या शुष्क भानगडीत पाडण्याचें तुम्हांस कांहीं कारण नाही. तुम्ही कोण त्याहि पंथाचे असा आणि त्यांनाहि वाटेल त्या पंथाचा अंगीकार करू द्या; पण हा अत्यंत उदात्त आणि अत्यंत उज्वल असा सर्व सामान्य पंथ मात्र तुम्ही विसरू नका; आणि तुमच्या मुलांबाळांसहि विसरू देऊ नका. जीवात्मा स्वभावतः परिपूर्ण आहे हे मत हिंदुस्थानांतील सा-या पंथांना सारखेच मान्य आहे. जें मूलतःच परिपूर्ण नाहीं तें कशानेंहि पूर्णत्व पावणार नाहीं; आणि बाह्य वस्तूंच्या उपाधीने पूर्णत्व त्याला चिकटविले, तरी ते केव्हांना केव्हां नष्ट होईल असें श्रीकपिलांनी म्हटले आहे. अपवित्रता हा मनुष्याचा स्वभाव असेल तर त्याने सदोदित अपवित्रच राहिले पाहिजे. दहापांच पळे पावि त्र्याची छाया त्याच्यावर पडली तरी पुनः तो पहिल्यासारखाच अपवित्र राहणार. पावित्र्याचे हे कवच आज ना उद्यां गळून जाऊन त्याचा मूळचा स्वभाव पुनः केव्हां तरी प्रकट होणार. वाघ्याचा पाग्या झाला तरी त्याचा मूळस्वभाव केव्हां तरी प्रकट होऊन त्याच्याकडून 'एळकोट' म्हणविल्यावांचून राहणार नाही. याकरिता आपले स्वाभाविक स्वरूप सच्चिदानंद हेच आहे असे आपले तत्वज्ञ सांगतात. मृत्युसमयी आपल्या महत्कृत्यांचे आणि उदात्त विचारांचे स्मरण ठेव असा उपदेश एका ऋषीने आपल्या मनाला केला, तो आपण सर्वांनी ध्यानात धरण्यासारखा आहे. आपलें दौर्बल्य आणि दुबळे विचार अथवा आपलें मूर्खत्व यांपैकी कशाचाहि स्पर्श आपल्या चित्ताला अखेरीस असूं नये अशी खबरदारी घेण्यावद्दल या ऋषिवर्याचा उपदेश आहे. मूर्खपणाची कृत्ये सर्वांच्याच हातून घडतात. दुबळेपणाचे विचार केव्हांना केव्हा आपल्या सा-यांच्या चित्तांत येत असतात; तथापि त्यांतूनहि आपल्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडू न देणे, हाच दौर्बल्यनाशाचा उपाय आहे. आपल्या साऱ्या मूर्खपणाला हेच उत्तम औषध आहे.
 हिंदुस्थानांतील निरनिराळ्या धर्मात आणि पंथांत सर्वांस मान्य असलेल्या काही मुद्यांचा विचार येथवर झाला; आणि याच सामान्य पायावर जुना,