पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] दानधर्म. २५१


बने तोपर्यंत आपले स्वातंत्र्य गमावण्याची इच्छा कोणासहि नसते. गोळा भर अन्नासाठी कायद्याच्या जाळ्यांत आपणांस बांधून घेणे, कोणासहि बरें वाटत नाही. कंगालखान्यांत जावयाचें नाही आणि बाहेर कोणाकडून काही मिळावयाचें नाही, अशा कैचीत सांपडलेल्या या गो-या उडाणटप्पूने चो-या करूं लागावें हे ओघासच आले. समाजाची सेवा तो करीत नाही, आणि स्वस्थ बसून खाण्याची सोय नाही. असे झाले म्हणजे तो समाजाचा शत्रु बनतो. समाजाला असे शत्रू निर्माण झाले म्हणजे सांपडेल तेथे आणि सांप डेल त्या रीतीने समाजावर ते प्रहार करीत सुटतात. मग त्यांच्या निवारणा साठी पोलिसांच्या तुकड्या हव्या, न्यायाधिकारी हवेत, कैदखाने पाहिजेत आणि बेड्या खोडेहि अवश्य पाहिजेत. संस्कृति या नांवाचा रोग मनुष्य जातीला जडलेला राहील, तोपर्यंत दारिद्र्य ही वस्तूहि असावयाचीच; आणि मग तिच्या निवारणासाठी उपायहि हवेतच. विलायती कायदेशीर निवा रण आणि आमचें अनिर्बंध निवारण या दोहोंपैकी कोणता मार्ग बरा आहे हे तुम्हीच ठरवा. आमच्या इकडे संन्याशी बैराग्यांत तरी आमच्या पद्ध तीचा मोठा दुरुपयोग होतो असे मला वाटत नाही. यांच्यांतील पुष्कळ लोक वैराग्यशील नसतील हे मला कबूल आहे. तथापि अन्न मिळविण्यासाठी आणि सोंगाच्या बतावणीपुरतें तरी धर्मज्ञान मिळविणे त्याला भाग पडते. ताकापुरतें रामायण सांगतां न आले, तर ताकहि त्याला मिळावयाचे नाही. पाश्चात्य देशांतील निवारणाचे कायदेशीर उपाय अमलात आणण्याकरिता केवढया तरी खर्चाची खाती समाजाला पोसावी लागतात; आणि या कंगा लखान्यांतील मिरासदार कंगाल लोक कंगालखान्यांतून तुरुंगांत आणि तुरुंगां तून कंगालखान्यांत, अशा यात्रा करीत आपला जन्म काढतात. अशा

स्थितीत या दोन पद्धतींपैकी बरी कोणती हे ठरविण्याचे काम तुमचें आहे.


***************