पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दानधर्म.


 (स्वामीजींचा मुक्काम मद्रास येथे असतांना 'चेन्नापुरी-अन्नदान-समा जम्' नांवाच्या संस्थेच्या वार्षिक सभेच्या प्रसंगी ते हजर होते. श्रोतृग णास स्वामीजींनी चार शब्द सांगावे अशी इच्छा प्रदर्शित केल्यावरून त्यांनी पुढील लहानसें भाषण केलें)
 ब्राह्मणाला इतर जातींहून अधिक समजून आणि दानावर त्यांचा विशेष हक्क आहे असे समजून त्यांना इतर जातींहून अधिक दान कोणी करूं नये, असें एक विधान माझ्या पूर्वीच्या वक्त्याने केले आहे. अशा रीतीनें ब्राह्म णज्ञातीला विशेष हक्क देण्यात जशी एक वाईट बाजू आहे, त्याचप्रमाणे या गोष्टीची एक चांगली बाजू आहे हेहि लक्षात ठेवले पाहिजे. आज हिंदुस्था नांत जी काही संस्कृति दिसत आहे, तिचे मुख्य अधिष्ठान आजहि ब्राह्मण वर्ग हेच आहे. तत्त्ववेत्तेहि आज याच वर्गात आहेत. ऐहिकापलीकडे उडी मारून अदृश्य प्रदेशांत तत्त्वरत्नें शोधण्याचे काम प्राचीन काळी ज्याप्रमाणे मुख्यतः ब्राह्मणांनी केले, त्याचप्रमाणे तें काम अंशतः ब्राह्मणवर्गच करीत आहे. इतर ज्ञातींनी ब्राह्मणांना पोसले, म्हणूनच बुद्धि वाढीला लावण्यास ब्राह्मणवर्गाला अवकाश मिळाला. त्या वर्गाच्या चरितार्थाची साधने तुम्ही आज सर्वथा नाहींशी केली, तर सा-या राष्ट्राचेच मोठे नुकसान होणार आहे. त्या विशिष्ट वर्गाचे मोठेंसें नुकसान होईल असे नाही. आमच्या देशांत दान धर्माच्या कामी अविचार फार होतो, असा एक आक्षेप आम्हांवर आहे. परक्या देशांतील कायदेशीर दानधर्म पुष्कळांना मोठा पसंत पडतो. पण या दोन प्रकारांची परस्पर तुलना केली, तर त्याचे परिणाम मात्र अगदी अनपेक्षित स्वरूपाचे आढळून येतात. दाता स्वतःच्या खुषीने जे कांहीं देतो, तें घेऊन आमचा हिंदी उडाणटप्पू खूष होतो व निघून जातो. कमी अ धिकाबद्दल तो तंटा करावयाचा नाही. दिले तेवढयांत संतोष मानून आपली जीवितयात्रा अगदी शांततेत तो घालवीत असतो. पण गोऱ्या उडाणटप्पूची गोष्ट याहून वेगळी आहे. कायद्याने निर्माण केलेल्या कंगालखान्यांत जा

ण्यास तो खुषी नसतो. कारण, तेथेंहि त्याचे हातपाय कायद्याने बांधलेले.