पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] आपणापुढील कार्य. २४५


अशी आमची समजूत आहे, तोवर व्यक्तिविशिष्ट परमेश्वरावांचून आह्मांस तरणोपाय नाही. या साऱ्या कल्पना आमच्या चित्तांत शिल्लक आहेत तोपर्यंत आत्मा, परमात्मा आणि बाह्य सृष्टि असें तीन स्वरूपांचे अस्तित्व कबूल कर ण्यावांचून आपणांस गत्यंतर नाही, हे श्रीरामानुजांनी उत्तम प्रकारे सिद्ध केले आहे. याकरितां बाह्य जग जोपर्यंत वेगळेपणाने भासत आहे, तोपर्यंत आत्मा आणि परमात्मा एकरूप आहेत असे म्हणणे ही पोकळ बडबड आहे. यांचें द्वैत प्रत्यक्ष भासत असतां तोंडाने एकरूपतेच्या गोष्टी सांगणे हा शुद्ध वेडेपणा नव्हे काय ? सामान्य मानवी मनाची घटनाच अशा प्रकारची आहे की, एकंदर अस्तित्वरूपाचा प्रत्यय त्याला वेगवेगळ्या स्वरूपांनीच व्हावा. आतां जे महापुरुष मनातीत स्थितीला जातात ते अर्थात् सृष्टिपलीकडेहि उड्डाण करितात. 'यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह' अशा शून्याव स्थेपलीकडेहि त्यांची मजल गेलेली असते. या ठिकाणी जीवात्म्याच्या सर्व बंधनांचा उच्छेद झालेला असतो आणि केवळ याच स्थितीत 'सोहम्' 'सर्व खल्विदं ब्रह्म' या वचनांचा अनुभव त्याला होतो. हा अनुभव होण्यास ज्ञान, विज्ञान आणि भक्ति या तिन्ही मार्गाचा उपयोग होतो. कृष्ण मध्येच अदृश्य झाला तेव्हां त्याच्या नांवाने टाहो फोडून गोपी आक्रंदन करूं लागल्या. 'कृष्ण, कृष्ण' यावांचून दुसरा उच्चार त्यांच्या तोंडाने होईना. सर्वत्र कृष्ण रूप त्यांना दिसू लागले. अखेरीस आपणहि कृष्णच आहों अशी भावना होऊन कृष्णाप्रमाणेच त्यांनी वस्त्रे परिधान केली आणि कृष्णाप्रमाणेच त्या क्रीडा करूं लागल्या. त्या कृष्णरूप बनून गेल्या. भागवतांत हे वर्णन केलेले आहे. यांत शुद्ध भक्तीने अद्वैतापर्यंत कसे जाता येते हे उत्तम प्रकारें दाखविले आहे. अशाच प्रकारची एक हकीकत सुफी मताच्या एका कवीनें फारसी भाषेत सांगितली आहे.
 आपल्या उद्दिष्टाकडे पोचण्याचे मार्ग अनेक आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांत पायऱ्याहि अनेक आहेत. याकरितां, त्यांजसंबंधी युद्धे करण्याचे कांहींच प्रयोजन आम्हांस नाही. आतां पुराणकालींच्या निरनिराळ्या टीका कारांनी आपापल्या दृष्टीने वेगवेगळी मतें प्रकट केली असली तरी त्या साऱ्यांसच आपण नमन करूं या. कारण, ज्ञान ही मर्यादित चीज नाही. त्याचप्रमाणे तिचा सर्व सांठा कोणा एकापाशींच आहे असेंहि नाही. तिच्या