पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


घडून येण्यासारखी नाही; पण तसे कधी काळी होणार असलेच तर असा सार्वलौकिक धर्म होण्याची योग्यता फक्त आपल्याच धर्माच्या अंगी आहे. त्यावांचून दुसरा कोणताहि धर्म सर्व जगाचा धर्म होणे शक्य नाही; आणि याचे कारणहि अगदी उघड आहे. आपल्या धर्मावांचून जगांतील दुसरा कोणताहि धर्म कोणा ना कोणा व्यक्तीपासून निर्माण झाला आहे. त्याचे जीवित कोणा ना कोणा व्यक्तीवर अवलंबून आहे. त्याच्या रचनेत एखादी ऐतिहासिक समजली जाणारी व्यक्ति मध्यवर्ती असून तिच्याच भोंवतीं त्या धर्माच्या साऱ्या इमारतीची उभारणी झाली आहे. असा एकच मध्यबिंदु असणे ही गोष्ट त्या धर्माच्या अस्तित्वाला विशेष बळकटी आणते असे त्यांना वाटतें; पण वास्तविक या गोष्टीने बळकटी येत नसून तो धर्म परावलंबी आणि दुबळा बनतो. ज्या मध्यवर्ती पुरुषाच्या भोंवतीं हे सारे जाळे विण लेले असते त्याचे अस्तित्वच नव्हते असे कोणी सिद्ध केले की, या साऱ्या धर्माचीहि इतिश्री झालीच; आणि असा प्रकार आजच घडूहि लागला आहे. अशा धर्मप्रवर्तकांपैकी निम्याशिम्यांची वाट आजच लागली असून बाकी चेहि हळूहळू तोच मार्ग आक्रमीत आहेत. यामुळे ज्या धर्मतत्त्वांना केवळ त्यांच्याच शब्दाचा पाठिंबा होता, ती तत्त्वेंहि हवेत उडून जाऊ लागली आहेत. आमच्या धर्माची गोष्ट अशी नाही. आमची धर्मतत्त्वें सनातन आ हेत. त्यांचे अस्तित्व कोणाहि एका व्यक्तीच्या शब्दावर अवलंबून नाही; ती स्वयंभू आहेत. आमच्यांतहि अवतारी पुरुष शेकडों होऊन गेले, तथापि त्यांपैकी कोणीहि आपला स्वतंत्र असा धर्म उभारला नाही. त्या सान्यांनी एकाच सनातन धर्माची तत्त्वे वेगवेगळ्या रीतींनी विशद केली. कृष्ण हा कृष्ण म्हणून मोठा नव्हे; अथवा तो विशिष्ट धर्माचा प्रवर्तक म्हणूनहि चिर स्मरणीय नव्हे. वेदांतधर्माचे स्पष्टीकरण अत्यंत उज्ज्वल रीतीने त्याने केलें म्हणून तो मोठा. हे कार्य कृष्णाने केले नसते तर बुद्धाप्रमाणेच तोहि काळाच्या पोटांत गडप झाला असता. बुद्ध हा काही कमी मोठा होता असें नाही. तथापि जें कार्य कृष्णाने केलें तें त्याने न केल्यामुळे हिंदुस्थानांत आज त्याचें नांवहि उरले नाही. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते ती ही की, कोणी कितीहि मोठा झाला तरी त्याला भुलून त्याच्यामागे आम्ही जात नाही. आम्ही व्यक्तींचे उपासक नसून तत्त्वांचे उपासक आहो. ज्याच्या ठिकाणी