पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]आपणांपुढील कार्य.२३७


आपल्या शक्तीचा प्रत्येक अंश खर्च करण्याची तयारी आपण ठेविली पाहिजे. परदेशीयांनी आपली हजारों सैन्ये वेथे आणून उतरविली तर ते त्यांना खुशाल करू द्या. त्यांच्या सशस्त्र सैन्यांचा महापूर येथे लोटला तरी त्या कडे तुम्ही मुळीच लक्ष्य देऊ नका. भरतभूमीच्या लेकरांनों ! जागे व्हा, उठा; आणि जग जिंकण्यासाठी कंबरा बांधा. प्रेमाने आम्ही द्वेष जिंकू, या तत्त्वाचा जयघोष याच भूमीत प्रथम ऐकू आला. द्वेष स्वतःला जिंकू शकत नाही, पण प्रेम त्याला जिंकते. जडवादाचा भयंकर धिंगाणा आज साऱ्या जगावर चालू आहे. त्याचा पराभव दुसरा जडवाद पुढे करून होणार नाही. एक जडवाद दुसऱ्याला जिंकील ही गोष्ट त्रिकाळांत घडणे नाही. कारण ते दो घेही तुल्यबळ आहेत. एक सैन्य दुसऱ्या सैन्याला जिंकण्यासाठी धडपडूं लागते, तेव्हां माणुसकी मरून मनुष्याच्या अंगी पशुत्वाचा संचार होऊ लागतो. मनु ध्याचा पशु बनविणे हे मानवी बुद्धीच्या कर्तृत्वशक्तीचे विजयचिह्न आहे काय ? जडवादाचा पराजय करण्यास एक अतींद्रिय ज्ञानच समर्थ आहे. या अतींद्रिय ज्ञानाने पश्चिम दिशेला तुम्ही जिंका. राष्ट्र म्हणून आपणांस जगाव याचे असेल, तर या पराविद्येची जोड आपण मिळविली पाहिजे. या तत्त्वाचे सत्यत्व पाश्चात्य लोकांस आता हळूहळू पटू लागले आहे. हे ज्ञान आतां कोठून येते हे पाहण्यासाठी ते उत्सुक होऊन बसले आहेत. ते दृष्टीस पडतांच त्याला निर्भरालिंगन देण्यासाठी आपले बाहु पसरून ते उभे राहिले आहेत. आतां त्यांची ही इच्छा कोण तृप्त करणार ? हिंदुस्थानांतील अवतारी पुरुषांचा संदेश त्यांच्यापर्यंत नेऊन पोचविण्यास कोण तयार आहे ? जगांतील प्रत्येक कोनाकोपऱ्यांत या संदेशाचा दुंदुभि वाजविण्याकरितां आपल्या सर्वस्वावर पाणी सोडण्यास कोण तयार आहे ? सत्याचा प्रसार करण्याकरितां असली अलोट छातीची माणसें आतां हवीं आहेत. वेदांतधर्माची विजयपताका जगांतील प्रत्येक कोनाकोपऱ्यांत रोवण्याकरितां तयार असलेले शूर वीर आज हवे आहेत. जगाला याच गोष्टीची आज जरूर आहे. इतकी की, तिच्या अ भावी जगाचा नाश होईल. झोंपी गेलेल्या ज्वालामुखीच्या शिखरावर आज सारे पाश्चात्य जग बसले आहे. हा भस्मासुर केव्हां जागा होईल याचा नेम नाही. तो जागा झाला की, क्षणार्धात साऱ्या पाश्चात्य जगाची राखरांगोळी करील. वेळ अशी आणीबाणीची आली आहे की, आपले कार्य थांबविण्यास