पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवस


ताकाशांत स्वच्छंदपणे भराऱ्या मारणे हा माझा जन्मस्वभाव आहे, आणि त्याला अनुसरून हिंदु कुलाची विजयपताका साऱ्या जगभर फडकत असल्याचे माझ्या कल्पनादृष्टीला दिसते.
 इतर राष्ट्रांस जिंकण्याचा धंदा करणारी अनेक मानवकुले आजपर्यंत या पृथ्वीतलावर होऊन गेली. हे जेतृत्व आमच्याही अंगी पुष्कळ आहे. इत रांपेक्षा त्याचा प्रकार वेगळा, इतकेंच. पराविद्या आणि धर्म या बाबींत आम्ही जे महान् विजय मिळविले, त्यांचे वर्णन सम्राट अशोक याने केले आहे. आताही या जुन्या इतिहासाची पुनरावृत्ति पुनः होणे इष्ट आहे. आतां आ णखीहि एक प्रचंड विजय हिंदुस्थानाने पुनः मिळविला पाहिजे. माझ्या आयु युष्यभर हेच स्वप्न मला पडत आहे; आणि माझ्या आजच्या साऱ्या शब्दांत हेच स्वप्न यापुढे पडत राहावे अशी माझी इच्छा आहे; आणि हे स्वप्न प्रत्यक्ष सृष्टींत खरे करण्याकरितां तुम्हांपैकी प्रत्येक जण आपली शिकस्त करून अखेरचा विजय संपादीपर्यंत शस्त्र खाली ठेवणार नाही अशीहि मला आशा आहे. आधी घर सांभाळा आणि मग काय तें करा, असा उपदेश कर णारी माणसें तुम्हांस दररोज हवीं तितकी भेटतील हे मला ठाऊक आहे. स्वतःचे घर सांवरल्यावर दुसऱ्याला मदत करावी असें पुष्कळ लोक तुम्हांस सांगतील; पण मी तुम्हांस निक्षून सांगतो की, स्वार्थ सोडून परार्थ साधणे हेच कार्य जेव्हा तुम्ही करूं लागतां, तेव्हांच तुमच्यांतील सा-या उच्च क्रिया सामर्थ्याचा उदय होतो. जगांतील तुमचे अत्युत्कृष्ट कार्य म्हटले तर परार्थासाठी जे केले असेल तेच. परक्यांच्या देशी जाऊन परक्यांच्या भाषेत परक्यांच्या हितासाठी धर्मज्ञानाचा उपदेश तुम्हीं केला, तर त्याबरोबरच स्वदेशाचीहि चाकरी तुमच्या हातून किती घडते, याची साक्ष आजची ही सभाच तुम्हाला देईल. माझें तत्त्वोपदेशाचे कार्य याच देशी राहून मी केले असते, तर आज त्याचा जो प्रसार येथे झाला आहे त्याच्या चवथ्या हिशानेंहि तो येथे झाला नसता. इंग्लंडांत आणि अमेरिकेंत जें दृश्य कार्य माझ्या हातून घडलें तेंच येथेहि अदृश्यपणे घडले आहे. हिंदुस्थानाने सारे जग जिंकावें हे आपणा सर्वांचेच अखेरचे उद्दिष्ट आहे; आणि हे साधण्याकरितां आपणांपैकी प्रत्येकानें सदो दित सज्ज राहिले पाहिजे. याहून दुसरे कोणतेंहि कमी प्रतीचे कार्य आपल्या नजरेसमोर आपण राहूं देऊं नये आणि याच्या पूर्तीची तयारी करण्यांत