पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]आपणांपुढील कार्य.२२७


वैभवाचे स्तोम अतिरेकास गेले होते. राष्ट्राची कर्तृत्वशक्ति हळू हळू लयास जात होती. बुद्धीच्या या अतिरिक्त आणि फाजील महत्वामुळे तिचा खरा जोम नाहीसा होऊन तीहि अवनतीच्या मार्गाला जाऊ लागली. ही अवनति कोण त्याही एका विशिष्ट वस्तू पुरतीच नसून तिचा व्याप हिंदुस्थानांतील सा-याच गोष्टींत थोडा फार आढळून येतो. साहित्यसंगीतादि कला घ्या, अथवा भौतिक शास्त्रे घ्या, तिचा प्रवेश कोठे नाही असे नाही. कलांत अवश्य अस णारा दृष्टीचा चौफेरपणा कोठेच दिसेनासा झाला. सौन्दर्याच्या कल्पनांतील उदात्तपणा नाहीसा झाला. नुसत्या बाह्य आकारांतील रेखीवपणाची कल्पनाही नाहीशी झाली, आणि यांच्या जागी भपकेबाज बेडौल आणि अगडबंब अशी पद्धति प्रचारांत येऊ लागली.नव्या कल्पना उत्पन्न करण्याचा जिवटपणा हिंदूंच्या मेंदूत राहिला नाहीसे दिसते. प्राचीन संस्कृत संगीतांत हृदयाला हालवून सोडण्याची जी शक्ति होती, तिचा प्रत्यय या काळांतील संगीतांत कोठेही येई नासा झाला. प्रत्येक स्वराला जें स्वातंत्र्य म्हणून असावें तें नष्ट झाले. अर्वा चीन कालचे संगीत म्हणजे अनेक स्वरांची नुसती खिचडी होय. तानांच्या गिरक्यांत अनेक स्वर अशा रीतीने एकत्र गुरफटतात की, त्यांतील कोणाही एकाचा स्वतंत्र पत्ता लागत नाही. संगीताची ही अवनतावस्था आहे. केवळ कल्पनेच्या साम्राज्याकडे तुम्ही पाहिले तरी तेथेही हाच प्रकार तुम्हांस आढळून येईल. जुन्या पुराण्या आणि उष्ट्या कल्पना डामडौलाच्या आणि भपकेबाज भाषेच्या शृंगारांत मांडलेल्या तुम्हांस आढळतील. येथेही नुसत्या बाह्य शृंगाराच्या भपक्यावर तुमचे डोळे भारून टाकण्याचा हा यत्न अस ल्याचे तुमच्या प्रत्ययास येईल. या पोषखाच्या आंत कल्पनेचा नवीनपणा असा कोठेच आढळावयाचा नाही. धर्म विचार ही आपली खास हक्काची बाब आहे असें तुम्ही समजतां, पण या बाबींत झालेल्या अवनतीस कोठे तोडही सांपडावयाची नाहीं; आणि असे होणे हे युक्तच आहे. पाणी पितांना भांडे उजव्या हातांत असावें की डाव्या हातांत असावें, असल्या प्रकारच्या प्रश्नांना अत्यंत निकडीचे महत्त्व देऊन त्यांच्या चर्चेत शेकडो वर्षाच्या काळाचा अपव्यय ज्यांनी केला, असल्या तत्त्ववेत्त्यांच्या बुद्धीतून अधिक चांगली फलप्राप्ति ती काय होणार ? ज्या देशांतील अत्यंत विशाल बुद्धीचे लोकही स्वयंपाक घरांतल्या गोष्टींची चर्चा करण्यांत शेंकडों वर्षे खर्च करि-