पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

या दोहोंच्याही पलीकडे तो जातो. अवश्य कर्तव्य असें त्याला काहीच उरत नाही, अथवा अमुक एक गोष्ट अकर्म असेंही त्याला वाटत नाही. तो दृश्य अस्तित्वाच्या पलीकडे गेलेला असतो. तो भविष्य कालाच्याही पलीकडे असतो. अशा प्रकारचे ज्ञान ज्याला झालें तो खरा ज्ञानी. त्यानेच खरोखर सर्व काही जाणलें. ज्याला जाणण्यासाठी वेद धडपडत आहेत, आणि ज्याच्या भेटीसाठी मनुष्ये सर्वसंगपरित्याग करून रानावनांत हिंडतात व दऱ्याखोऱ्यांचा आश्रय करतात त्याचे नांव मी तुला सांगतो. त्याचे नांव ॐ असे आहे. 'ॐ इत्येकाक्षरं ब्रह्म ।' ॐ हे ब्रह्मरूप आहे. ॐ हेच चिरंतन आहे, तें अनंत आहे. हे रहस्य ज्याला कळले त्याच्या सर्व इच्छा तृप्त होतात. नाचिकेता, ज्या मानवी आत्म्याचा शोध तूं करीत आहेस, तो आत्मा कधीं जन्मास येत नाही अथवा कधी मृत्यूही पावत नाही. त्याला आरंभ अमुक काली झाला असे नाही. तो सदासर्वदा आहेच. देहाच्या मृत्यूबरोबर तो भरतही नाही. मी मारतों असें म्हणणारा आणि मी मारला जातों असें म्हणणारा हे दोघेही मूर्ख होत; कारण आत्मा मारीत नाही आणि स्वतः मरतही नाही. त्याचे रुप 'अणोरणीयान् महतोमहीयान्' असें आहे. अशा स्वरूपाचा तो सर्वाधीश प्रत्येकाच्या हृदयाच्या गुहेत वास करतो. जो कोणी पूर्ण निष्पाप झाला असेल त्या प्रत्येकाला त्याचे दर्शन होते, आणि त्याचे सर्व वैभव तो पाहतो. अशा मनुष्यावर परमेश्वर कृपा करतो. परमेश्वराची कृपा झाल्याशिवाय त्याचे दर्शन होऊ शकत नाही. अशा प्रकारें आत्मानुभव ज्याला प्राप्त झाला आहे तो मनुष्य एके जागी बसला असतांही दूरचा प्रवास करतो. तो एके जागी दिसत असला तरी तो नाही असें ठिकाणच नाही. ज्या ठिकाणी परस्परविरोधी अशा सर्व वस्तूंची एकवाक्यता होते त्या परमेश्वराचे दर्शन पवित्र अंतःकरणाच्या आणि सूक्ष्म बुद्धीच्या मनुष्यावांचून दुसऱ्या कोणास होणार ? हे दर्शन होण्याची पात्रताच दुसऱ्या कोणाच्या अंगी असत नाही. तो अशरीर असला तरी तो प्रत्येक देहांत आहे. सर्वांचा स्पर्श त्याला होतोसे दिसत असले तरी त्याला कोणीही दूषित करूं शकत नाही. आत्मा सर्वव्यापि, सर्वभूतांतरात्मा आहे हे जाणून बुद्धिमंत सर्व शोक टाकून देतात. वेदाध्ययनाने हा आत्मा प्राप्त होत नाही, अथवा बुद्धीचा विस्तार केवढाही वाढला तरी त्याची प्राप्ति होत नाही. त्याच-