पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.२२१


आणि परमात्मा यांचे अस्तित्व विसरून जाऊन ते निरीश्वरवादी झाले, असेंहि आचार्यांनी सिद्ध केले आहे. आचार्याच्या या तत्त्वांचा प्रसार होऊन लोकांना ती पटतांच या लोकगंगेच्या प्रवाहाची दिशा बदलली. हिंदु लोक आपल्या प्राचीन धर्माकडे पुनः वळू लागले. पण पूर्वीच्या अनेक चाली त्यांच्या अंगी इतक्या पक्क्या खिळून गेल्या होत्या की, त्यांचा त्याग त्यांना सहसा करवेना. यानंतर श्रीरामानुजांचा अवतार झाला. श्रीशंकराचार्य विशालवुद्धि होते, यांत शंका नाही. तथापि अंतःकरणाची आर्द्रता त्यांजपाशी नव्हती, असे मला म्हणावेसे वाटते. त्यांची बुद्धि जितकी विशाल होती तितकी विशालता अंतःकरणाला नव्हती. रामानुज या बाबींत त्यांच्याहून अधिक श्रेष्ठ होते. समाजाच्या तळी वावरणाऱ्या कनिष्ठ वर्गाबद्दल रामानुजांचे चित्त कळवळलें होते. या वर्गाबद्दल त्यांच्या चित्तांत अत्यंत सहानुकंपा होती. या वर्गाला धर्ममार्गाला लावावयाचें तर शुद्ध तत्त्वप्रधान धर्म त्यांना पटावयाचा नाही, ही गोष्ट रामानुजांच्या लक्षात आली. या वर्गाची बुद्धि जड, तत्त्वांचे आक लन करण्याचे सामर्थ्य तिला नाही, याकरितां ही परोक्षतत्त्वें प्रत्यक्ष विधि विधानांच्या रूपाने त्यांजपुढे मांडली पाहिजेत, हे लक्षात आणून रामानु जांनी जुने पूजाप्रकार शुद्ध करून ते पुनः चालू केले आणि त्यांत कांही नव्यांचीहि भर घातली. ज्यांना परोक्ष तत्त्वें पटविण्याचा दुसरा कोणताहि मार्ग उपयोगी नाही, त्यांच्याचकरितां ही तयारी रामानुजांनी केली होती. पण असे करीत असतांहि तत्त्वज्ञानमंदिराचे कवाड त्यांनी बंद केले नाही. ब्राह्मण आणि त्यांच्याचसारख्या दुसऱ्या उच्च वर्णाकरितां तत्त्वज्ञानाची सोपा नपरंपरा निर्माण करून पूजनाचा उच्च प्रकारही त्यांनी सुरू केला. अशा रीतीने अगदी तळातल्या अंत्यजापासून तो थेट सर्वश्रेष्ठ ब्राह्मणापर्यंत सर्वांनाच धर्माचा मार्ग रामानुजाने मोकळा करून दिला. रामानुजांनी जें कार्य केलें त्याचे स्वरूप अशा प्रकारचे आहे. रामानुजांच्या या कार्याचा प्रसार उत्तरे- कडेहि झाला. तथापि तेथे त्याचे स्वरूप परिणतावस्थेस येण्यास बराच काळ लोटावा लागला. मुसलमानांच्या स्वाऱ्या होऊं लागेपर्यंत उत्तरेतील धर्म ग्लानि समूळ नाहींशी झाली नव्हती. यानंतर तेथे थोडेबहुत धर्मवीर निर्माण होऊ लागले आणि समाजसुधारणेचे बरेच कार्य त्यांनी केले. या सर्वांच्या मुकुटस्थानी योजना करण्यासारखें नांव म्हटलें म्हणजे श्रीचैतन्य यांचेच .